पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेशी असलेलं कनेक्शन आता समोर येत आहे. हल्ल्यापूर्वी दोन महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमास आणि लष्कराच्या कमांडरमध्ये अनेकवेळा बैठका झाल्याची माहिती असून हमास वापरत असलेले मोडस ऑपरेंडी पहलगाम हल्ल्यात वापरण्यात आल्याचंही समोर आलं आहे.
पहलगाम हल्ल्याचं हमास कनेक्शन उघड
पहलगाम हल्ल्यापूर्वी हमास आणि पाक लष्करच्या गाठीभेटी झाल्या असून पीओकेत दहशतवाद्यांच्या तळांवर हमासकडून ट्रेनिंग दिलं गेलं आहे. गाझा आणि काश्मीर प्रश्न एकच असल्याचा दहशतवाद्यांकडून उल्लेख करण्यात आला. विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यात हमासच्या कमांडोंची मोडस ऑपरेंडी वापरली गेल्याचं दिसून आलं.

गाझा आणि काश्मीरचा प्रश्न एकच असून जिहाद हेच या प्रश्नांना उत्तर आहे, असं सांगणारा हा दहशतवादी लष्कर कमांडर अबू मुसा असून पहलगाम हल्ल्याच्या चार दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेचं कनेक्शन यातून उघड होत आहे. पीओकेतून ट्रेनिंग देऊन भारतात पाठवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांमागे गाझा आणि हमास संघटना असल्याचं आता समोर येत आहे.
पहलगाम हल्ल्याचं हमास कनेक्शन
1. हल्ल्यापूर्वी पीओकेत हमास आणि लष्करच्या गाठीभेटी
2. रावळपिंडीतही हमास आणि दहशतवाद्यांमध्ये चर्चा
3. हामसच्या कमांडोंकडून दहशतवाद्यांचं ट्रेनिंग
4. पहलगाम हल्ल्यात हमासप्रमाणे गो प्रो कॅमेऱ्यांचा वापर
5. दहशतवाद्यांनी डोक्यावर कॅमेरे लावल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती
6. गुडघ्यावर बसवून डोक्यात गोळी मारण्याची पद्धतही हमासची
गेल्या वर्षभरापासून हमासचा जैश आणि लष्कर या दहशतवादी संघटनांशी संबंध वाढल्याचं संरक्षण तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. हमास दहशतवादी संघटनांचा हा पाकव्याप्त काश्मिरातील शिरकाव आगामी काळात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
काय आहे हमास संघटना?
1. पॅलेस्टाईनमधील इस्लामी दहशतवादी गट
2. 1980च्या उत्तरार्धात मुस्लीम ब्रदहूडपासून वेगळा
3. 2006 साली गाझा पट्टीवर हमासच्या ताब्यात
4. इस्रायलविरुद्ध हल्ल्यांमुळे दहशतवादी संघटना घोषित
5. 2023 साली दक्षिण इस्रायलवर हल्ला, 1200 जणांचा मृत्यू
6. इस्रायल-हमास युद्धात 40 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू
इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याप्रमाणेच हमास जगातील सर्वच मुस्लीम दहशतवादी संघटनांना एक करत असून, ही जगासमोरची धोक्याची घंटा असल्याचं संरक्षण तज्ज्ञ सांगतायेत. हमास जगभरात इस्लामिक दहशतवाद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. पहलगामसारखे दहशतवादी हल्ले आगामी काळात अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रातही होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन हमासमुळे उघड झालंय. त्यामुळे हा दहशतवाद रोखण्यासाठी जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज आता व्यक्त होत आहे.