Jyoti Malhotra – यूट्यबर ज्योती मल्होत्राच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योतीनं पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती पोहोचवली आहे. या प्रकरणात ज्योतीला अटक केली असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आलीय. दरम्यान, यूट्यबर ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसे घेतल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच तिच्यासोबत आणखीन कोणाचे कनेक्शन आहे. याची चौकशी सुरु आहे.
ज्योतीचं चीन कनेक्शन
यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं आता चीन कनेक्शनही समोर आलं आहे. तसेच तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली आहे. त्याचसोबत तिचे चीनसोबत संबंध असल्याचेही समोर आले आहे. ज्योती चीनमध्ये गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. ज्योतीला चीनमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट आणि सुरक्षा देण्यात आल्याची धक्कादाकय माहिती समोर आली आहे. चिनी अधिका-याच्या भेटीनंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आली असून, तिचे कसून चौकशी करण्यात येत आहे. दुसरीकडे ज्योतीने थायलंड, बांगलादेश, भुतानमध्येही जाऊन आली आहे. त्यामुळं तिचे अजून कोणासोबत संबंध आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

ज्योतीसह आयएसआय गुप्तहेरांना अटक
दुसरीकडे यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह इतर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. आणखीही काही आयएसआय गुप्तहेर यांनाही अटक करण्याची माहिती समोर आली आहे. तसेच देवेंद्र सिंह नावाच्या एका तरुणालादेखील अटक करण्यात आलीय. देवेंद्र सिंह हा पाक गुप्तचर यंत्रणाच्या संपर्कात होता. अशी माहिती पुढे आलीय. ज्योती ही पाकिस्तानकडून पैसे घेत होते, असे चौकशीत समोर आले आहे. याव्यतिरिक्त अरमान आणि दानिश नावाच्या तरुणालाही अटक करण्यात आलेय. अरमानला पैसे आणि काही सीमकार्ड दानिशनं दिले होते. दानिशकडून पैसे घेऊन अरमान दुसऱ्या हेरांना पैसे पोहोचवत होता. दरम्यान, यूट्यबर ज्योती मल्होत्रा हीचे कसून चौकशी सुरु आहे.