मुंबईत कोरोनाची एन्ट्री? अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा कोव्हिड १९ रिपोर्ट पॉझिटिव्ह

शिल्पा शिरोडकर ही एक भारतीय अभिनेत्री आणि ९० च्या दशकातील मॉडेल आहे. १९८९ ते २००० या काळात तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Shilpa Shirodkar Tested Positive For Covid 19 : ‘बिग बॉस १८’ ची स्पर्धक आणि ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. २०२० आणि २०२१ मध्ये कहर केल्यानंतर, कोरोना आता पुन्हा एकदा मुंबईत धडकला आहे. अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, अशा परिस्थितीत शिल्पाने सर्वांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

शिल्पा शिरोडकर हिने सोमवारी (१९ मे) इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. तिने लिहिले, की “हॅलो मित्रांनो, माझा कोव्हिड-१९ टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कृपया सुरक्षित रहा आणि मास्क घाला. – शिल्पा शिरोडकर.”

आता अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाल्याने सर्वजण चिंतेत आहेत. तिचे चाहते आणि फॅन्स ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

शिल्पा शिरोडकर लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना

शिल्पा शिरोडकर हिच्या पोस्टवर सोनाक्षी सिन्हाने लिहिले, की “अरे बापरे! शिल्पा, स्वतःची काळजी घे. लवकर बरी हो.” जूही बब्बरने लिहिले, “अरे बापरे, स्वतःची काळजी घे.” अभिनेत्री इंदिरा कृष्णानेही शिल्पाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तिची मैत्रीण चुम दरांग आणि बहिण नम्रता शिरोडकर यांनीही लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, काही चाहते मात्र कोविड-१९चे नाव ऐकूनच चकित झाले.

शिल्पा शिरोडकर प्रसिद्ध  मॉडेल आणि अभिनेत्री

शिल्पा शिरोडकर ही एक भारतीय अभिनेत्री आणि ९० च्या दशकातील मॉडेल आहे. १९८९ ते २००० या काळात तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तब्बल १३ वर्षांनंतर तिने ‘एक मुट्ठी आसमान’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. त्यानंतर २०२४ मध्ये ती सलमान खानच्या रिअ‍ॅलिटी शो Bigg Boss१८ मध्येही झळकली. शिल्पा शिरोडकरच्या पतीचे नाव अपरेश रंजीत आहे आणि त्यांना एक मुलगी आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News