ऑपरेशन सिंदूर चित्रपटासाठी अक्षय कुमार-विक्की कौशलमध्ये रगंलीय चुरस? ट्विंकल खन्नाने सांगितली आतली गोष्ट

ट्विंकल खन्ना हिने एका वृत्तपत्रात फेक न्यूजवर आधारित एक नवीन कॉलम लिहिला आहे. या कॉलममध्ये तिने 'ऑपरेशन सिंदूर चित्रपटासाठी अक्षय आणि विक्की यांच्यातील जंग' या अफवेवर भाष्य केले आहे.

Operation Sindoor Movie : अक्षय कुमार आणि विक्की कौशल हे देशभक्तीवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. विक्कीने उरी: द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामधील भूमिकेसाठी प्रचंड कौतुक मिळवले होते आणि अक्षय कुमार तर अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्याने सर्वाधिक देशभक्तिपर चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अशा परिस्थितीत, जेव्हा चित्रपटसृष्टीत ऑपरेशन सिंदूर या आगामी चित्रपटाबाबत चर्चा सुरू झाली आहे, तेव्हा सोशल मीडियावर अशा अफवांना उधाण आले आहे, की या चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि विक्की कौशल यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. पण आता ट्विंकल खन्ना हिने यामागची आतली गोष्ट सांगितली आहे.

अक्षय आणि विक्की यांच्यात खरोखरच चुरस सुरू आहे का?

ट्विंकल खन्ना हिने एका वृत्तपत्रात फेक न्यूजवर आधारित एक नवीन कॉलम लिहिला आहे. या कॉलममध्ये तिने ‘ऑपरेशन सिंदूर चित्रपटासाठी अक्षय आणि विक्की यांच्यातील जंग’ या अफवेवर भाष्य केले आणि सांगितले, की जेव्हा तिने आपल्या पतीला (अक्षयला) याबद्दल विचारले, तेव्हा त्याने काय उत्तर दिले.

ट्विंकल खन्ना हिने आपल्या कॉलममध्ये लिहिले?

ट्विंगकले लिहले आहे की, “मी आयोडीन सोल्युशनने पनीरची टेस्ट  करू शकते, पण सत्याची लिटमस टेस्ट काय आहे?” तिने पुढे लिहिले, “माझ्याकडे ट्विट्सचा पाऊस सुरू होतो आणि मग मी घरच्या मुखियाला म्हणजे अक्षयला फोन करून वाद घालायला सुरुवात करते.” ट्विंकलने सांगितले की तिने अक्षयला लगेच विचारले की ऑपरेशन सिंदूर या चित्रपटाबद्दल काय सत्य आहे आणि ही अफवा खरी आहे का? ट्विंकल खन्नाने सांगितले की तिने अक्षय कुमारला फोन करून विचारले, “मी नुकतंच वाचलं की तू विकी कौशलसोबत ऑपरेशन सिंदूर या चित्रपटासाठी भांडत आहेस.”

यावर अक्षय हळूहळू श्वास घेत म्हणाला, “ही खोटी बातमी आहे, आणि माझ्या जखम झाली आहे, म्हणून मी तुला नंतर फोन करतो.” ट्विंकलने या वरून मिश्कीलपणे म्हटलं की, “जर त्याला फोन कट करायचाच असेल, तर किमान चांगलं कारण तरी द्यावं!”

प्रत्येक गोष्टीवर शंका घेतेय ट्विंकल

ट्विंकल खन्ना हिने पुढे सांगितले की जेव्हा अक्षय कुमार घरी परतला, तेव्हा त्याच्या पायाला खरंच बँडेज बांधलेलं होतं. त्यानंतर ट्विंकलला जाणवले की तिचा पती खरे बोलत होता.

ट्विंकल पुढे म्हणाली, “, एका सीनसाठी त्याच्या पायाला खरंच आग लागली होती. आजकाल हे समजणेच कठीण झाले आहे की काय खरे आहे आणि काय खोटे, म्हणून मी प्रत्येक माहितीवर शंका घेते.”

ऑपरेशन सिंदूरवर बनतोय चित्रपट

७ मे रोजी भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानात दहशतवादी संघटनेच्या मुसक्या आवळण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली होती. या मिशनच्या केवळ तीन दिवसांतच उत्तम माहेश्वरी यांनी ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट तयार होतोय, अशी घोषणा केली आणि त्याचा पहिला पोस्टर सुद्धा जाहीर केले. या गोष्टीमुळे अनेक लोक नाराज झाले होते, आणि त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केल्यावर उत्तम माहेश्वरी यांनी एक पोस्टद्वारे माफी सुद्धा मागितली होती.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News