सोळा सोमवारचे उपवास कधी सुरू करू शकतो? कोणता महिना सर्वोत्तम आहे, जाणून घ्या…

जे लोक सोमवारचा उपवास करतात, त्यांना भगवान महादेव आणि देवी पार्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो. तशी श्रद्धा आणि विश्वास आहे.

सोळा सोमवारचे उपवास प्रामुख्याने अविवाहित मुली किंवा विवाहित महिला पाळतात. अविवाहित मुली योग्य वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात आणि विवाहित स्त्रिया त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी हे व्रत करतात. 

सोळा सोमवारचे उपवास सुरू करण्याचा सर्वोत्तम महिना कोणता? 

सोळा सोमवारचे व्रत करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे श्रावण महिना.  हा महिना या उपवासासाठी विशेष शुभ मानला जातो. यावर्षी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार 14 जुलै रोजी आहे. हिंदू धर्मात श्रावण मास भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. 16 सोमवारचे उपवास (व्रत) श्रावण महिन्यात सुरू करणे चांगले मानले जाते. श्रावण महिना भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. 16 सोमवार व्रत केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त होते, तसेच अनेक समस्या दूर होतात. या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा करण्याची प्रथा आहे.  या व्रतामुळे वैवाहिक जीवन सुखी होते, अविवाहित महिलांना योग्य वर मिळतो, आणि मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी 16 सोमवारचे व्रत सुरू केले जाते. या व्रतादरम्यान, शिव-पार्वतीची पूजा, कथा आणि मंत्रांचा जप केला जातो.

सोळा सोमवारचे व्रत कसे करावे?

श्रावण महिन्यात किंवा कोणत्याही शुभ सोमवारी व्रताचा संकल्प घ्यावा. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. 16 वेळा भगवान शंकरासमोर व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. दिवसभर फलाहार करावा. शिवलिंगाला गंगेचे पाणी किंवा दुग्ध अर्पण करून जलाभिषेक करावा. पंचामृताने पूजा करावी, बेलपत्र, फुलं, अक्षता अर्पण करावी. पूजेदरम्यान, ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा तुम्ही शिवाच्या 108 नावांचा जप देखील करू शकता. सोळा सोमवार व्रताची कथा किंवा महात्म्य वाचन करावे. आरती करून प्रसाद वाटप करावा. सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर 17 व्या सोमवारी उद्यापन करावे. उद्यापन करताना, ब्राह्मणांना आणि आप्तेष्टांना भोजन द्यावे. 

सोळा सोमवारचे महत्त्व

सोळा सोमवार व्रत हे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या भक्तीसाठी केलेले एक खास व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू केले जाते. या व्रताचा मुख्य उद्देश मनोकामना पूर्ण करणे, तसेच वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणणे आहे. हे व्रत मनोभावे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात, अशी धारणा आहे. हे व्रत केल्याने भगवान शिव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात. दर सोमवारी हे व्रत केले जाते, आणि 16 सोमवार पूर्ण झाल्यावर उद्यापन केले जाते. व्रतामुळे मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते, ज्यामुळे जीवनातील अडचणींवर मात करता येते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News