IPL 2025 Todays Match : इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये आज (१९ मे) लखनऊ सुपरजायंट्स (LSG) संघ आपला सर्वात महत्त्वाचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी LSG ला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे. सध्या LSG ने ११ सामन्यांतून १० गुण मिळवले असून, गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट -०.४६९ इतका आहे.
लखनौला मोठ्या फरकाने जिंकावं लागणार
प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी लखनऊ सुपरजायंट्सला उर्वरित तिन्ही सामने केवळ जिंकावेच लागणार नाहीत, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल, जेणेकरून नेट रन रेटमध्येही सुधारणा करता येईल.

लखनऊ संघाची सर्वात कमजोर कडी सध्या संघाचा कर्णधार ऋषभ पंत ठरत आहे. या हंगामात किमान १०० चेंडू खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये पंतचा स्ट्राइक रेट सर्वात कमी म्हणजेच ९९.२२ आहे. यावरून स्पष्ट होते की पंत अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहेत.
प्लेऑफसाठी तीन संघ आधीच पात्र ठरले आहेत, ज्यामध्ये RCB, GT आणि पंजाब किंग्ज यांचा समावेश आहे. आता उरलेल्या एकाच जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस सुरू आहे. मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यापैकी कोणताही एक संघच प्लेऑफचे तिकीट मिळवू शकतो. दुसरीकडे, गेल्या वर्षीची उपविजेता सनरायझर्स हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा सामना प्रतिष्ठा वाचवण्याची संधी असेल.
तसेच, काही खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही शेवटची संधी ठरणार आहे, कारण या हंगामात SRH च्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली असून त्यात काही मोठ्या नावांचाही समावेश आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग इलेव्हन : मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई.
सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी/जयदेव उनाडकट.
LSG विरुद्ध SRH ड्रीम इलेव्हन टीम –
यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन, निकोलस पूरन (कर्णधार), इशान किशन
फलंदाज: मिचेल मार्श, आयुष बदोनी
अष्टपैलू: अभिषेक शर्मा (उपकर्णधार), एडन मार्कराम, कामिंदू मेंडिस
गोलंदाज: हर्षल पटेल, पॅट कमिन्स, आवेश खान.