1971 नंतर पहिल्यांदाच पाकचे कराची बंदर लक्ष्य; भारताच्या हल्ल्याने पाकची आर्थिक घुसमट वाढणार?

भारत - पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत आहे. आता भारताने थेट पाकच्या कराची बंदरावर हल्ला चढवला आहे. त्यामुळे पाक आर्थिक कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.

भारत – पाकिस्तान युध्दजन्य परिस्थिती आता दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेताना दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील काही दहशतवादी तळ उध्वस्त केले. परिणामी पाकिस्तानने भारतातील काही शहरांवर ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ला चढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानच्या सातत्याने सुरू असणाऱ्या कुरघोड्यांना भारताने रात्रीच्या अंधारात जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, कारण भारतीय नौदलाने आता थेट कराची बंदरावर हल्ला चढवला आहे.

कराची बंदरावर हल्ला

भारतीय नौदलाने रात्रीच्या अंधारात कराची बंदरावर गुप्तपणे हल्ला केला. हे बंदर पाकिस्तानच्या जागतिक व्यापाराछ्या दृष्टीने महत्वाचे आहे. बंदरावर तैनात असलेल्या पाकिस्तानी नौदलाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. भारताने एकामागून एक अनेक क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे कराची बंदराचे मोठे नुकसान केले. भारतीय नौदलाच्या हल्ल्याचा केंद्रबिंदू केवळ आर्थिक पायाभूत सुविधांवर नव्हता, तर पाकिस्तानी नौदलाची जहाजे, शस्त्रास्त्रे डेपो आणि टेहाळणी करणारी केंद्रे देखील पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. कराची बंदर हे पाकिस्तान नौदलाचा कणा मानले जाते आणि त्यावरील हा हल्ला त्यांच्या सामरिक सामर्थ्याला थेट आव्हान देतो.

पाकची आर्थिक कोंडी होणार?

पाकिस्तान बऱ्याच काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे. देशात अन्नधान्याचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत आता पाकला जबर झटका बसला आहे. कारण पाकिस्तानच्या जागतिक व्यापाराछ्या दृष्टीने महत्वाचे असणारे कराची बंदर भारताने उध्वस्त केले आहे. 1971 च्या युध्दाच्या काळात देखील असाच हल्ला भारताने बंदरावर केला होता. त्यानंतर आता पुन्हा ही घटना घडत आहे. बंदरावरील जहाजे, व्यापारी सुविधा, युध्दनौका यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. रात्रीच्या अंधारात भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्यामुळे आता पाक पुरता बिथरल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून हल्ल्याबाबत कोणतेही स्पष्ट विधान करण्यात आलेले नाही. दुसरीकडे कराचीमधील स्फोटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण पाकिस्तान अधिकृत पुष्टी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तानमध्ये ब्लॅक आऊट

भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. मिसाईल आणि ड्रोनने हल्ला केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानने अख्ख्या पाकिस्तानात ब्लॅकआऊट जारी केला आहे. पंजाब, सिंंध प्रांतात अधिक खबरदारी घेतली जात आहे. शाळा, कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तर भारताने सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला आहे. पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यास सांगितलं आहे. तसेच सायरन वाजताच प्रतिसाद देऊन ब्लॅकआऊट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News