IPL 2025 : सध्या भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर आयपीएलचे सामने मध्येच थांबवण्यात आले आहेत. मात्र आता याबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा बीसीसीआय सुरु करण्याच्या विचारात आहे. मात्र यावेळी सामन्याचे ठिकाण आणि वेळापत्रक यात बदल होणार आहे.
नवीन वेळापत्रक कसे असणार
दरम्यान, सर्व 10 संघांना स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक याची माहिती बीसीसीआय आज रात्री (11 मे) देणार आहे. यासह स्पर्धेची तारीखही वाढवण्यात येणार आहे. म्हणजेच 25 मे ऐवजी आता चालू हंगामाचा अंतिम सामना 30 मे 2025 रोजी खेळवला जाईल. तसेच नवीन वेळापत्रकात अधिक डबल हेडर यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

🚨 IPL 2025 REMAINING MATCHES. 🚨
– The IPL likely to be extended till 30th May.
– Bengaluru, Chennai and Hyderabad to host the remaining matches.
– New scheduled to be released by tonight to IPL teams. (Express Sports). pic.twitter.com/rXPCPdpaNS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 11, 2025
तीनच ठिकाणी सामने?
दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलचे नियोजित ठिकाणचे सामने रद्द करण्यात आले आहेत. तसेच आयपीएलचे उर्वरित सामने केवळ तीनच ठिकाणी खेळविण्यात येण्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आयपीएल लीगचे उर्वरित सामने केवळ चेन्नई, बेंगळुरु आणि हैदराबाद या ठिकाणी खेळवले जातील. आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवला जाणार होता. मात्र आता भारत पाकिस्तानमधील वाढता संघर्ष या धरतीवर चालू हंगामाच्या सामन्यांची पुढे ढकलण्यात आली आहे.