Chhatrapati Shivaji Maharaj statue : कोकणातील सिंधुदुर्ग, मालवण येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण दर्शन आणि पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज महाराजांचा भव्य-दिव्य असा पुतळा उभा केला आहे, काही महिन्यांपूर्वी येथे दुर्घटना घडली. मात्र लगेचच आमच्या सरकारने महाराजांचा याच ठिकाणी भव्य-दिव्य पुतळा उभा करण्याचा निर्धार केला होता.
आणि अगदी विक्रमी वेळेत पुतळा पुन्हा उभा केला आहे. त्यामुळं मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि शिल्पकार राम सुतार या दोघांनाही धन्यवाद देतो. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढील 100 वर्ष पुतळा टिकेल…
शिल्पकार राम सुतार यांच्यासोबत जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रमुख आणि आयटीचे इंजिनियर्स होते. अत्यंत चांगले डिझाईनकेले आहे. कोकणामध्ये जी काही तुफान आणि वादळी वारा येतो, त्या सगळ्यांच्या अभ्यास करून पुतळा तयार केला आहे. 91 फुट उंचीचा हा पुतळा आहे. यात 10 फुटाचा पेरेस्टल आहे. मंत्री शिवेंद्रराजे मला सांगितले की, बहुदा देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील या पुतळ्याकडे आपणाला पाहता येईल, अशी उत्तम रचना करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिंवेद्रराजी भोसले, मंत्री नितेश राणे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. आज
पुतळ्याची काय आहेत वैशिष्टये?
- पुतळ्याचा चौथरा ३ मीटर उंचीचा
- 15 फूट लांबीची तलवार आहे
- प्रसिद्ध आणि ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी पुतळ्याचं काम केलेय
- पुतळा ९१ फूट उंचीचा आहे
- 100 वर्ष पुतळा टिकेल एवढं पुतळ्याचं काम मजबूत
- महाराजांचा पुतळा ८ एमएम जाडीच्या कांस्य धातूपासून बनवलाय
कोकणाला झुकतं माप…
याआधीही सरकारने कोकणाला निधीत कमतरता केलेली नाही. कोकणाला झुकतं माप देण्याचं काम सरकारने केलं आहे. पुढेही कोकणाला जास्तीत जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहिले. पर्यटनाबाबत आमचे कोकणावर जास्त लक्ष आहे. आणि आम्ही कोकणाचा विकास करु. राज्याचा सुरक्षेचा आम्ही आढावा घेतलाय. राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आपण पूर्णपणे तयारीत आहोत, असं सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.