डोनाल्ड ट्रम्प यांचं बिग ब्युटिफुल बिल अमेरिकेच्या संसदेत मंजूर, करात आणि खर्चात कपात

याच विधेयकावरुन डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क यांच्यात वाद रंगला होता. दोन दिवसांपूर्वी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात 50 विरुद्ध 51 मतांनी हे विधेयक पारित करण्यात आलं.

वॉशिंग्टन डीसी- अमेरिकेतील संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये गुरुवारी बिग ब्युटिफुल बिल मंजूर करण्यात आलंय. या विधेयकाच्या समर्थमनार्थ 218 तर विरोधात 214 मतं पडली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या विधेयकामुळे करात आणि खर्चात कपात होणार आहे.

ट्रम्प यांच्या पक्षातील दोन खासदार थॉमस मेसी आणि ब्रायन फिट्जपॅट्रिक यांनी विधेयकाविरोधात मतदान केलं. याच विधेयकावरुन डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क यांच्यात वाद रंगला होता. दोन दिवसांपूर्वी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात 50 विरुद्ध 51 मतांनी हे विधेयक पारित करण्यात आलं. उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी अखेरच्या क्षणी निर्णायक मतदान विधेयकाच्या बाजूनं केलं.

बिग अँड ब्युटिफुल बिलातील सहा महत्त्वाचे मुद्दे

1. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील कर कपातीत आणखी वाढ
2. टिप्स आणि ओव्हरटाईम पगारावरील कर रद्द होणार
3. व्यवसाय आणि उद्योगांसाठी करातून सवलत मिळणार, सामाजिक सुरक्षेसाठी करात सूट नाही
4. इलेक्ट्रिक वाहनं आणि सोलारवरील कर सवलत संपुष्टात
5. सरकारला उधार किंवा कर्ज घेण्याच्या मर्यादेत 4 ट्रिलियन डॉलर्सची वाढ
6. काही राज्यांत एआय नियम निर्मितीपासून रोखणार

नवे बिल वेडेपणा, मस्क यांची काय टीका?

एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या या नव्या बिलावर सातत्यानं टीका केली आहे. ट्रम्प यांचं हे नवं विधेयक अमेरिकेतील लाखो नोकऱ्यांवर गदा आणणारं असेल, अशी टीका मस्क यांनी अलिकडे केली होती. देशाची मोठी रणनीती हानी या नव्या कायद्यानं होणार असल्याचा मस्क यांचा दावा आहे. हे नवं विधेयक वेडेपणा आणि विनाशकारी असल्याचंही मस्क यांनी म्हटलं होतं. जुन्या उद्योगांना या नव्या बिलामुळे दिलासा मिळणार असला तरी भविष्यातील उद्योग यामुळे उद्ध्वस्त होतील, असंही मस्क म्हणाले होते. या विधेयकावरुन झालेल्या वादानंतर मस्क यांनी सरकारमधील इफिशिंयन्सी विभागाच्या प्रमुखपदाचा गेल्या महिन्यात राजीनामा दिलेला आहे.

सबसिडी बंद केली तर अफ्रिकेत जावं लागेल- ट्रम्प

मस्क यांच्या या टीकेला ट्रम्प यांनी जोरदार उत्तर दिलं होतं. मस्क यांना देण्यात येणारी सबसिडी बंद केली तर त्यांना आपलं दुकान आवरुन दक्षिण अफ्रिकेत जाऊन राहावं लागेल, अशी तिखट प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली होती. सबसिडी बंद झाली तर टेस्ला कंपनी इलेक्टिक कारचं उत्पादन करु शकणार नाही, तसंच स्पेस एक्स आणि सॅटेलाईट लाँट होणार नाहीत, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. मस्क यांच्या कंपन्यांना सरकारकडून जितका पैसा मिळाला तितका क्वचितच एखाद्याला मिळाला असेल असंही ट्र्म्प म्हणालेत.


About Author

Smita Gangurde

Other Latest News