Shivsena Uddhav thackeray Video post – हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारने मागे घेतला आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता. दरम्यान, हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही भावांनी ५ जुलै रोजी विशाल मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र त्यापूर्वीच सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला आहे. त्यामुळं ५ जूलैला मोर्चा ऐवजी विजयी मेळावा ठाकरेंनी बंधूनी आयोजित केला आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना आता शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंचा ‘जय गुजरात’चा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
एक तर हे भोंदू आहेत, नाही तर संधीसाधू! pic.twitter.com/mXEtLx25xK
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 4, 2025
भोंदू आहेत नाही तर संधीसाधू…
दरम्यान, पुण्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रसोबत जय गुजरात म्हटल्यानंतर उबाठा गटाकडून टीका केली जात असतानाच आता शिवसेनेच्या वतीने अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून उद्धव ठाकरेंचा एका जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे ‘जय गुजरात’ म्हणत असल्याचे दिसते आहे. सोबत ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ अशीही टीका करण्यात आली आहे.
परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न…
मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंचा हा व्हीडिओ शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रेंनीही एक्सवरुन पोस्ट केला आहे. यावर त्यांनी ‘अनेक जण हे विसरले असतील म्हणून परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न…’ असं कप्शन लिहिले आहे.