पहिलं हॉकीसाठी मग क्रिकेटसाठी, तुम्ही पाकड्यांसोबत खेळणार आहात का? युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सवाल

"आपल्या देशात होणारा आशिया चषक आणि मग युएईमध्ये होणारा आशिया चषक, पहिलं हॉकीसाठी मग क्रिकेटसाठी, तिकडे तुम्ही पाकड्यांसोबत खेळणार आहात का? हे स्पष्ट उत्तर आम्हाला केंद्र सरकारकडून हवे आहे."

Aditya Thackeray – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हॉकी आशिया चषक स्पर्धेवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पाकिस्तानला स्पर्धेत खेळण्यासाठी भारताच्या क्रीडा मंत्रालयाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही हॉकी स्पर्धा भारत-पाकिस्तान क्रिकेट आशिया चषकाची रंगीत तालीम असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

मग क्रिकेटकडे वळायचे हे केंद्राचे धोरण…

दरम्यान, आपल्या देशात हॉकीचा आशिया चषक होत आहे. आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने पाकिस्तानला खेळण्यासाठी एनओसी दिली आहे. “कदाचित हा पहिला टप्पा असेल आणि यानंतर क्रिकेटचा आशिया चषक होणार आहे, जिथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे. कदाचित बीसीसीआयला काही बोलता येत नाहीये, आयसीसीला काही बोलता येत नाहीये, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हॉकीमध्ये होऊ द्यायचा आहे. तोही आपल्या देशात होऊ द्यायचा आहे,” असे आदित्य ठाकरे ट्विटमधे म्हणाले. लोकांची भूमिका आणि भावना किती तीव्र आहेत हे पाहून नंतर क्रिकेटकडे वळायचे, असे भाजप-केंद्र सरकारचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘बिझनेस ॲज युज्युअल’…

यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी ठाकरेंनी केली. एप्रिलमधील पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत आदित्य ठाकरे म्हणाले, जिथे अद्यापही अतिरेकी सापडलेले नाहीत. आणि पकडलेही गेले नाहीत. पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांना अजूनही पकडण्यात आलेले नाही आणि ते कुठे आहेत, याचीही माहिती नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर, “ऑपरेशन सिंदूर झालं न झालं तर आपलं डेलिगेशन जगभरात गेले. मोठ्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं होऊन भाजपला जर वाटत असेल, यावर आपण मत मिळवून लोकांना फसवू शकतो आणि मग ‘बिझनेस ॲज युज्युअल’ करू शकतो,” असे म्हणत ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News