ब्राझीलने भारताला दिला झटका; आकाश संरक्षण प्रणाली खरेदीची चर्चा बंद!

भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलने भारताच्या 'आकाश' जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या चर्चा थांबवल्या आहेत.

भारतासाठी धक्कादायक असणारी अशी बातमी ब्राझीलमधून समोर येत आहे. भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलने भारताच्या ‘आकाश’ जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या चर्चा थांबवल्या आहेत. समोर आलेल्या माहितनुसार  ब्राझीलने काही महत्त्वाच्या ऑपरेशनल पॅरामीटर्समध्ये ‘आकाश’ क्षेपणास्त्राची कमकुवत कामगिरी हे या निर्णयामागील कारण असल्याचे सांगितले आहे. आता ब्राझीलने युरोपातील संरक्षण क्षेत्रातील दिग्गज संस्थेसोबत चर्चा सुरू केली आहे. एन्हांस्ड मॉड्यूलर एअर डिफेन्स सोल्युशन्स प्रदान करते.

भारतीय स्वदेशी बनावटीत कमतरता?

भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला एक गंभीर आव्हान आहे. भारताने ‘आकाश’ हे त्यांच्या सर्वात यशस्वी देशांतर्गत प्रणालींपैकी एक म्हणून वर्णन केले आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचा प्रचार करत आहे, परंतु ब्राझिलची नाराजी दर्शवते की परदेशी सैन्ये नाटो-मानक तंत्रज्ञानाला अधिक विश्वासार्ह मानतात, तर भारताच्या प्रणालींना त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही अधिक काम करावे लागेल. आजच्या काळात युद्धात, जेव्हा हायब्रिड युद्ध, ड्रोन हल्ले आणि स्मार्ट बॉम्बचा वापर वाढत आहे, तेव्हा ब्राझिलला वाटते की आकाश या धोक्यांना तोंड देण्यासाठी पुरेसे नाही.

आधी पंतप्रधान मोदींचा सन्मान; नंतर भारताला झटका

दरम्यान, चार दिवसांपूर्वी ब्राझीलचे राष्ट्रपती लुला यांनी पंतप्रधान मोदींना ब्राझिलचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस’ देऊन सन्मानित केले. मोदी यांनी अलीकडेच ब्राझिलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेतला.पुढील वर्षी भारत ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. त्यानंतर आता ब्राझीलकडून भारताला हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

युरोपीयन प्रणाली आधीच NATO देशांमध्ये वापरली जात आहे आणि ती विश्वासार्ह मानली जाते. ब्राझिलियन मीडिया द रिओ टाईम्सच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की ब्राझिलियन सैन्य आणि MBDA यांच्यातील चर्चा सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 4.7 अब्ज रिंगिट) च्या कराराभोवती फिरत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News