Ajit Pawar – राज्यातील तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पुढील चार महिन्यात घेण्याच आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे .
तर स्वबळावर निवडणूक लढू
जर भाजपा पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीत असतील किंवा महायुतीत आणि कुणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारीत असतील तर आम्हीही स्वबळावर निवडणूक लढवू. असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुण्यात बैठक संपल्यानंतर ते माध्यमातून संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे देखील त्यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे आता एकीकडे काँग्रेसनेही पालिका निवडणुकीचा नारा स्वबळावर लढन्याचा दिला असताना महायुतीत आगामी काळात पालिका निवडणूक स्वबळावर लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
महायुतीत एकाच ठिकाणी दोन पक्षात जर तुल्यबळ लढत होत असेल तर अशावेळी कार्यकर्त्यांना नाराज करून चालणार नाही. अशावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागेल असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. जर भाजपा असे स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे वक्तव्य करत असेल तर आम्हीही स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत,
असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे समर्थन देखील केले आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यात होणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे एकत्रितरित्या निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.