शिर्डी: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे. परंतु, या घटनेमुळे भक्तांमध्ये मात्र चांगलीच घबराट पसरली आहे. भाविक सुरक्षेच्या कारणास्तव मंदीर दर्शनाला काहीशी टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
नेमकं काय घडलं?
शिर्डी साईबाबा मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. धमक्यांमुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असली तरी, भाविकांच्या श्रद्धेला कोणतीही धक्का पोहोचू नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.

पूर्वी कधी आली होती धमकी?
शिर्डीतील साईबाबा मंदिराला 2013 मध्ये बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. गुप्तचर विभागाच्या इशाऱ्यानंतर, मंदिर ट्रस्टने भक्तांना फुलं आणि हार घेऊन मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घातली, कारण दहशतवादी गट यांचा वापर बॉम्ब लपवण्यासाठी करू शकतात अशी शक्यता होती. मात्र त्यावेळी यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नव्हता. मधल्या काळात देखील शिर्डी साई बाबा मंदिराला धमकी आल्याची अनेक प्रकरणे आहेत. बऱ्यापैकी वेळा धमकी ही सामाजिक शांतता भंग करू पाहणाऱ्या समाजकंटकांकडून दिली जात होती. आताच्या प्रकरणात देखील पोलीस यंत्रणा सतर्कपणे तपास करत आहे. यामध्ये लवकरच सत्य समोर येईल. आणि धमकीचे कारण समजेल. दुसरीकडे सुरक्षा व्यवस्था सतर्क असल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर सध्या लक्ष ठेवून आहे.