पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांची फेब्रुवारी महिन्यात भेट घेतली होती. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. दमानियांच्या नावे ब्राॅड कास्ट असलेल्या ग्रुपवर हा दावा करण्यात आला. दमानियांच्या या दाव्यावरून अंधारे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या. ‘काल तुम्ही (अंजली दमानिया) माझ्या विरोधात पत्रकारांमध्ये बातमी पेरायचा प्रयत्न केला. तेव्हा तुमचा बालिशपणा म्हणून मी सोडून द्यायचं ठरवलं होतं. पण आज तुम्ही पुन्हा ट्विट करत तुम्हाला आडनावावर बोलता येत नाही असं सांगितलं. तुमच्या जरा मी लक्षात आणून दिलं पाहिजे तुम्हाला आडनावावर बोलता येत की नाही हा संशोधनाचा विषय आहे मात्र आडनाव बघून तुम्हाला अजेंडे राबवता येतात हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.’

दमानियांचे अंधारेंना प्रतिआव्हान
सुषमा अंधारे यांचे ट्विट रिट्विट करत दमानिया यांनी म्हटले आहे की, मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती. की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात, आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरे आहे की नाही ह्यावर खरं उत्तर द्याल का? बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो, म्हणून बोलले नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा.
फुकट फौजदारकी तुमच्याजवळ राहू द्या…
ठाकरे, पवार, फडणवीस, मुनगंटीवार, बावणकुळे, ह्या सगळ्यांना पाहून घेऊच, पण प्रश्नाचे उत्तर का बरं दिले नाहीत? अजित पवारांच्या घरी गेला होतात की नाही, आणि पक्ष प्रवेश करणार होतात की नाही, असा सवाल अंजाली दमानिया यांनी अंधारे यांना ट्वविटरवर विचारला. त्याला उत्तर देताना अंधार म्हणाल्या, बाई आपण अशक्य मूर्ख प्रांतात आहेत. फुकट फौजदारकी तुमच्याजवळ राहू द्या. तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुम्ही कुणी तीसमार खान नाहीत. तुम्ही कुणाच्या पे रोलवर काम करता हे आधी स्पष्ट करा.जमल्यास अमृता फडणवीसानी अनिक्षा जयसिंगानीच्या विरोधात का FIR का केली यावर अक्कल पाजळा..