अवघ्या दोन रन्सने चैन्नईचा पराभव, आयुष म्हात्रेची खेळी व्यर्थ; बंगळुरू पहिल्या क्रमांकावर

प्रथम फलंदाजी उतरलेल्या बंगळुरूची आक्रमक सुरुवात झाली. विराटचा नवीन ओपनार पार्टनर 21 वर्षीय जेकब बेथेल याने जोरदार फटकेबाजी केली.त्याने अवघ्या 33 बाॅल्समध्ये 55 धावा केल्या.

बंगळुरू :  चैन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राॅयल चॅलेंजर बंगळुरू सामन्यात बंगळुरूने दिलेले 214 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चैन्नई पार करू शकली नाही. अवघ्या तीन धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चैन्नई 211 धावा केल्या. रवींद्र जडेचा आणि आयुष म्हात्रे यांनी आक्रमक फलंदाजी केली. आयुषने 94 धावा केल्या तर जडेज्याने 77 धावा केल्या. मात्र, ते पराभव टाळू शकले नाही. या विजयाने पाँईंट टेबलमध्ये बंगळुरू पहिल्या क्रमांकावर आली आहे.

बंगळुरुने 213 धावा केल्या. चैन्नईचा स्टार बाॅलर मथीशा पाथिराना याने अवघ्या 36 धावा देत तीन विकेट घेतल्या. तर सॅम करन, नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. तर, बंगळुरूकडून लुंगी एनगिडी याने 30 रन्स देत चैन्नईच्या तीन फलंदाजांना बाद केले.

आयुष म्हात्रे चमकला

चैन्नईचा अवघ्या 16 वर्षीय बॅटर आयुष म्हात्रे याने बंगळुरूच्या गोलंदाजांना पळती भुई थोडी केली. त्याने अवघ्या 48 चेंडूत 9 चौकार आणि पाच सिक्सच्या मदतीने 94 धावा केल्या. आयुष शतक करेल, असे वाटत असताना लुंगी एनगिडीच्या एका आत येणाऱ्या बाॅलवर तो चकला आणि कृणाला पांड्याकडे कॅच देऊन आऊट झाला.

जेकब बेथेल- विराटाची फटकेबाजी

प्रथम फलंदाजी उतरलेल्या बंगळुरूची आक्रमक सुरुवात झाली. विराटचा नवीन ओपनार पार्टनर 21 वर्षीय जेकब बेथेल याने जोरदार फटकेबाजी केली.त्याने अवघ्या 33 बाॅल्समध्ये 55 धावा केल्या. तर, विराट कोहली याने देखील आक्रमक फटकेबाजी करत 33 बाॅल्समध्ये पाच चौकार आणि पाच सिक्सच्या मदतीने 62 रन्स केल्या. त्याला सॅम करनने खलील अहमदकडे झेलबाद केला.

रोमारियो शेफर्डकडून धुलाई

आक्रमक सुरुवातीनंतर बंगळुरूच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. पड्डीकल 17, रजत पाटीदार 11, जितेश शर्मा 7 रन्स करू शकले. मात्र, सातव्या क्रमांकावर आलेल्या रोमारियो शेफर्डने चैन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 14 चेंडूत सहा सिक्स आणि चार फोर लगावत 53 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे बंगळुरूने 213 धावा केल्या.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News