मुंबई : एप्रिल महिन्याच्या माझी लाडकी योजनेचे पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी खूश खबर आहे. अक्षय्यतृतीयेला बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने महिला नाराज होता. मात्र, अवघ्या दोन दिवसांत योजनेचे पैसे जमा करण्यास सरकारडून सुरुवात करण्यात आली आहे.
एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता आजपासून (शनिवार) पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जातो आहे. तर, ज्या महिला शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. त्यांच्या खात्यात 500 रुपये जमा केले जात आहेत. सर्व पात्र महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. मात्र, पुढील दोन दिवसांत सर्व पात्र महिलांनाी पैसे मिळतील, असे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.
निधी वळवल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप
लाडक्या बहिणींसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचा निधी वळवण्यात आला आहे.
म्हणजे एका योजनेसाठी राज्यातील इतर गरजूंची परवड सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री, काँग्रेसची विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते म्हटले की, निधी पळवून झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री आता निधी वळवून झाल्यावर राग व्यक्त करतात आपल्या खात्यात काय सुरू आहे हे सुद्धा मंत्री शिरसाठ यांना माहिती नाही. खात्याशी संबंधित मंत्र्यांच्या संमतीशिवाय निधी वळवला? निधी वळवून झाल्यावर सामाजिक न्याय मंत्र्यांच्या संतापाला काही अर्थ उरतो का? या सरकारचा कारभार प्रश्न उपस्थित करणारा आहे. सगळा दिखावा आहे,यांनी एक निर्णय घ्यायचा, दुसऱ्यांनी टीका करायची… आणि जनतेला भूलथापा द्यायच्या.