12th Examination Result – सोमवारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेचा निकाल लागला. यात यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी ची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान, घेण्यात आली होती.
या परीक्षेचा निकाल सोमवारी दि. 5 मे 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केला. निकालानंतर बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले.

आवडीनुसार क्षेत्र ठरवावे…
दरम्यान, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असेही मंत्री भुसे यांनी म्हटले आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि,
विभागनिहाय निकाल कसा?
- कोकण विभागातील 22,797 (96.74 टक्के)
- कोल्हापूर विभागातील 1,06,004 (93.64 टक्के)
- मुंबई विभागातील 2,91,955 (92.93 टक्के)
- छत्रपती संभाजीनगर 1,65,961 (92.24 टक्के)
- अमरावती 1,32,814 (91.43 टक्के)
- पुणे 2,21,631 (91.32 टक्के)
- नाशिक 1,44,136 (91.31 टक्के)
- नागपूर 1,36,805 (90.52 टक्के)
- लातूर विभागातील 80,770 (89.46 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.38
- मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58