नाहीतर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन, मंत्री संजय शिरसाठ नक्की काय म्हणाले?

अजित पवार हे मुद्दाहून करतात का? असा प्रश्न शिरसाठ यांना विचारला असता, ते मुद्दामहून करत असतील. असं मला वाटत नाही. परंतु जे त्यांना अधिकारी ब्रिफिंग देतात. माहिती देतात ती चुकीचे देत असावी. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. माझा कुठल्याही योजनेला विरोध नाही.

sanjay shirsath – विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचारात जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन दिलं होतं. दरम्यान, नुकताच लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या खात्यातील निधी या योजनेकडे वर्ग केल्याचं समोर आलाय. तर दुसरीकडे सामाजिक न्याय खात्याचा निधी निधी कपात करून तो लाडक्या बहिणी योजनेकडे वळवला आहे.

यावरून मंत्री संजय शिरसाठ यांनी आज पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. जर मला पूर्ण निधी नाही मिळाला तर सामाजिक न्याय विभाग चालवणे अवघड होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

चुकीचे ब्रिफिंग दिले जात असावे….

दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली होती. आणि या योजनेमुळे अनेक लाडक्या बहिणींना फायदा होत आहे. परंतु सामाजिक न्याय खात्यातील निधी कपात करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे वित्त विभागाकडून किंवा अर्थ खात्याकडून असे का होत आहे, यातला झारीतील शुक्राचार्य कोण आहे? हे मला माहित नाही. परंतु यावर महायुतीतील आमचे तिन्ही नेते बसून यावर तोडगा काढतील, असे मला वाटते. याबाबत मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून याची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे. असे शिरसाठ म्हणाले.

अन्यथा खाते सांभाळणे अवघड…

जर शंभर टक्के आमच्या विभागाला निधी दिला तर आम्ही आमच्या विभागाला न्याय देऊ, एकदाच सुरुवातीला संपूर्ण निधी द्या, तो हवेतर नंतर त्यातून कपात करा, पण मुळातच निधी कपात करायची. परिणामी खाते चालवणे अवघड होऊन बसले आहे, असं म्हणत पुन्हा एकदा संजय शिरसाठ यांनी नाराजी व्यक्त केली. राज्याचे बजेट अडीच लाख कोटीचे आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाला 29 हजार 500 कोटीचा निधीचा तरतूद हवी होती. यानुसार 11.8% नुसार निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र तेवढा निधी मिळाला नाही. केवळ 22 हजार 658 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

त्यापैकी 6,765 कोटीचा निधी इतर विभागासाठी राखीव ठेवण्यात आलाय. तर 3960 कोटी हे लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलाय. 1485 कोटी घरकुल योजनेसाठी तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलतसाठी 1320 कोटी रुपये देण्यात आलेत. त्यामुळे मूळ विभागासाठी 15893 कोटीचे तरतूद करण्यात आली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News