मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवर रविवारी प्रवास करताना मनस्ताप पदरी येण्याची शक्यता आहे. तिन्ही मार्गांवर मेन्टेनन्स आणि इंजिनिअरिंगच्या कामांमुळे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान मेगाब्लॉक असेल, हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदर या मार्गांवर शनिवारी रात्री मेगा ब्लॉक असेल.
मध्य रेल्वेवर कुठे मेगाब्लॉक ?
- ठाणे आणि कल्याण रेल्वे स्टेशनांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० पर्यंत
- सीएसएमटी दादरवरुन सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस ठाणे ते कल्याण दरम्यानव पाचव्या मार्गावर वळवल्या जातील
- अप मेल-एक्सप्रेस कल्याण ते विक्रोळी दरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर कुठे मेगाब्लॉक?
- वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक
- या दोन्ही रेल्वे स्टेशवरील फेऱ्या पूर्णपणे बंद राहतील
- पनवेल ते नाखुर्द या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत
- हार्बरवरील प्रवाशांना या काळात मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी
पश्चिम रेल्वे मार्गावर कुठे मेगाब्लॉक?
- वसई रोड ते भाईंदर दरम्यान
वेळ- शनिवारी मध्यरात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४ पर्यंत - या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.
