“अरे तुम्ही काय स्वातंत्र सैनिक म्हणून जेलमध्ये नव्हता?”, संजय राऊतांच्या पुस्तकावर मनसेची शेलक्या शब्दांत टीका

भाजपच्या टिकेनंतर आता मनसेनही संजय राऊत यांच्या पुस्तकावरून टीका केली आहे. तर संजय राऊत हे खरे होते म्हणून लढले...असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सर्व टीकेला संजय राऊत कसे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sandeep Deshpande : खासदार संजय राऊत हे १०० दिवस तुरुंगात होते. तुरुंगातील अनुभव याचे कथन त्यांनी पुस्तक स्वरूपातून मांडले आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांचे तुरुंगातील ते 100 दिवस, “नरकातला स्वर्ग” हे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आणि जेष्ठ गीतकार तथा दिग्दशक जावेद अख्तर यांच्या हस्ते आज पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. मात्र या पुस्तकावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रियेत असून, संजय राऊत यांच्या पुस्तकावर टिका होत आहे. आता मनसेनेही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राऊत हे पाकिस्तानसारखे…

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक याचे प्रकाशन आज सायंकाळी होणार आहे. मात्र त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजप नेत्यांच्या टिकेनंतर मनसेने ही आता सडकून टीका केली आहे. मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “संजय राऊत हे पाकिस्तानसारखे आहेत, गुन्हे करायचे आणि ‘victim card ‘खेळायचं. अरे तुम्ही काय स्वातंत्र सैनिक म्हणून जेलमध्ये नव्हता गेलात.

आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेला होतात” अशा प्रकारची पोस्ट संदीप देशपांडे यांनी करत संजय राऊत यांच्या पुस्तकावरून टीका केली आहे. तसेच तुम्ही तुरुंगात काही स्वातंत्र सैनिक म्हणून घेला नव्हता तर घोटाळा केला म्हणून गेला होता. आणि तुम्ही म्हणजे पाकिस्तानसारखे आहे गुन्हे करायचे आणि victim card खेळायचे. अशा प्रकारची शेलक्या शब्दात संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

राऊतांवर भाजप, मनसेची टिका…

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संजय राऊत यांच्या पुस्तकावरून टीका केली आहे. संजय राऊत यांनी भूखंड घोटाळा केला, याची जर खरी माहिती समोर आली तर त्या भूखंड घोटाळ्यावरती आणखी एक पुस्तक वेगळे लिहावे लागेल. असा विखे पाटील यांनी टोला संजय राऊत यांना लगावला आहे.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल विचारले असता, “आता कथा, कादंबऱ्या वाङ्मय हे वाचायचं माझं वय राहिले नाही…

त्यामुळे संजय राऊत यांचे पुस्तक वाचण्याचा काही संबंध येत नाही… प्रश्न नाही…” असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावरून लगावला आहे. यानंतर भाजपाच्या टिकेनंतर आता मनसेनही संजय राऊत यांच्या पुस्तकावरून टीका केली आहे. तर संजय राऊत हे खरे होते म्हणून लढले…असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सर्व टीकेला संजय राऊत कसे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News