चीन, सिंगापूरमध्ये ‘या’ विषाणुमुळे अनेकांचा मृत्यू, भारताला धोका आहे का?

कोरोना व्हायरसचे रूग्ण चीन, सिंगापूर, थायलंड या देशांत वाढल्याची माहिती समोर येत आहे. वाढत्या रूग्णसंख्येसोबत मृतांमध्ये देखील वाढ होत आहे. भारताला याचा धोका आहे का, सविस्तर जाणून घेऊ...

 चीन-हाँगकाँग आणि सिंगापूर-थायलंडमध्ये कोरोना विषाणू डोकं वर काढत आहे. त्याला भारताला देखील याचा धोका आहे का? अशी चर्चा सुरु आहे. हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड सारख्या अनेक आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या देशांमधील रुग्णालयांमध्ये गर्दी वाढण्याव्यतिरिक्त, मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे, जी गेल्या एका वर्षातील सर्वाधिक आहे.

भारताला धोका आहे का?

आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत भारताने देखील सतर्क राहण्याची गरज आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार, भारतात आतापर्यंत कोविड-19 चे फक्त 93 रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना साथीच्या नवीन लाटेची कोणतीही चिन्हे नाहीत. असं देखील सांगितलं आहे. त्यामुळे तुर्त तरी भारताला या नव्या सब व्हेरीएंटपासून फार मोठा धोका नसल्याची माहिती आहे.

आशियाई देशांत पुन्हा धोका

आशियातील काही देशांमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे चीन आणि सिंगापूरमध्ये मृत्यूंच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सिंगापूरमध्ये अनेक नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला आहे. चीनमध्ये  कोविड-19 संबंधित वाढत्या मृत्यूंची नोंद झाली आहे. विशेषतः वृद्ध आणि इतर आजार असलेल्या लोकांमध्ये या विषाणूचा गंभीर परिणाम होत आहे. या वाढत्या प्रकरणांमुळे भारतासाठीही चिंता वाढली आहे, कारण या देशांतील वाढत्या संक्रमणामुळे भारतातही संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.

सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ ढाली आहे. मे महिन्याच्या आधी कोरोणाच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांची संध्या 14 हजार 200 पर्यंत पोहोचली. या काळात रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही 30 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.चीनच्या सीडीसीनुसार, 4 मे पर्यंतच्या गेल्या पाच आठवड्यात रुग्णालयांमध्ये कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर दुप्पट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोंगक्रान महोत्सवानंतर थायलंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रूग्णांमध्ये कमकुवत असणारी प्रतिकार क्षमता हे या वाढत्या रूग्णसंख्येचं कारण सांगितलं जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News