वास्तुशास्त्र खूप महत्वाचे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने वास्तुमध्ये दिलेल्या उपायांचा अवलंब करून आपले काम केले तर त्याला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. घर बांधताना आणि सजवताना वास्तू नियमांची काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती रोखली जाते, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. घराच्या तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या कुठल्याही वस्तुला कुठल्या जागी ठेवावी. जर तिजोरी चुकीच्या दिशेने ठेवली गेली असेल तर तुमच्या पैशांची बचत होत नाही. वास्तुशास्त्रानुसार तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी हे जाणून घेऊया….
तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी?
वास्तुशास्त्रानुसार, तिजोरी किंवा लॉकर उत्तर दिशेकडे किंवा ईशान्य दिशेकडे (उत्तर-पूर्व) उघडायला पाहिजे. उत्तर दिशा लक्ष्मी आणि कुबेरदेवाचे निवासस्थान मानली जाते. ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व) ही देवाचे स्थान मानले जाते, त्यामुळे तिजोरी या दिशेकडे उघडल्यास घरात शांती आणि समृद्धी येते. तिजोरी किंवा लॉकर उत्तर दिशेकडे उघडल्यास घरात धन-संपत्ती आकर्षित होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, असे म्हटले जाते.
दक्षिण दिशा
वास्तुशास्त्रानुसार, तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण ती यमाची दिशा मानली जाते. या दिशेला तिजोरी ठेवल्यास, पैसा टिकत नाही, या दिशेला यमाचे स्थान मानले जाते, जे नकारात्मक ऊर्जा आणि अडचणींशी संबंधित आहे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)