माझं वय आता कथा, कादंबऱ्या वाचायचं नाही, फडणवीस यांची राऊत त्यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संजय राऊत यांच्या पुस्तकावरून टीका केली आहे. संजय राऊत यांनी भूखंड घोटाळा केला, याची जर खरी माहिती समोर आली तर त्या भूखंड घोटाळ्यावरती आणखी एक पुस्तक वेगळे लिहावे लागेल. असा विखे पाटील यांनी टोला संजय राऊत यांना लगावला आहे.

Devendra Fadnavis – खासदार संजय राऊत यांचे तुरुंगातील ते 100 दिवस, “नरकातला स्वर्ग” हे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते आज पार पडणार आहे. या पुस्तकातून संजय राऊत यांनी अनेक दावे केलेले आहे. तसेच काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत. मला अटक करण्यासाठी कसे षडयंत्र रचले गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मी कसा फोन केला…,

यानंतर आशिष शेलार यांचा मला कसा फोन आला. याची सविस्तर माहिती या पुस्तकातुन दिली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या पुस्तकावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

या वयात मी कथा, कादंबरी वाचत नाही…

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या तुरुंगातील शंभर दिवस, नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशन आज मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी दिगजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मात्र यावर राजकीय क्षेत्रातील प्रतिक्रिया येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल विचारले असता, “आता कथा, कादंबऱ्या वाङ्मय हे वाचायचं माझं वय राहिले नाही… त्यामुळे संजय राऊत यांचे पुस्तक वाचण्याचा काही संबंध येत नाही… प्रश्न नाही…”

असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावरून लगावला आहे. तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संजय राऊत यांच्या पुस्तकावरून टीका केली आहे. संजय राऊत यांनी भूखंड घोटाळा केला, याची जर खरी माहिती समोर आली तर त्या भूखंड घोटाळ्यावरती आणखी एक पुस्तक वेगळे लिहावे लागेल. असा विखे पाटील यांनी टोला संजय राऊत यांना लगावला आहे.

खरे होते म्हणून लढले…

तर दुसरीकडे संजय राऊत हे तुरुंगात शंभर दिवस राहिले. ते खरे होते… त्यांनी कोणताही वाईट काम केलं नाही… म्हणून ते लढले आणि शंभर दिवस तुरुंगात राहिले. त्यामुळे त्यांचे कौतुक केले पाहिजे. ते कारवाईला घाबरून गेले नाहित. ज्यांनी घोटाळा केला…, चुकीचे काम केले…, गैरकृत केलेले होते ते घाबरून भाजपाकडे गेले… पक्षांतर केले… पण संजय राऊत यांनी असे केले नाही… ते घाबरले नाहीत. त्यामुळे त्यांचे कौतुकच आहे. अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News