तुम्हीही कागदी कपमध्ये चहा किंवा कॉफी पिता का? जाणून घ्या त्याचे परिणाम

आजकाल पेपर कपचा वापर वाढला आहे, पण या पेपरकपमुळे आपलं आरोग्य किती धोक्यात येऊ शकतं याची कल्पनाही कदाचित आपल्यापैकी कित्येकांना नसेल. त्यामुळे हायजिन म्हणून वापरत असलेले हे पेपर कप आपल्या आरोग्यावर किती दुष्परिणाम करतात हे जाणून घ्या

आजकाल सर्वत्र म्हणजे चहाच्या टपरीवर किंवा अगदी ऑफिसमध्येही युज अँड थ्रोवाले पेपर कप पाहायला मिळतात. आणि आपण त्यांचा वापर हायजिन म्हणून करतो. हायजिन म्हणून वापरत असलेल्या या पेपर कपमुळे तुमच्या आरोग्याचं किती नुकसान होऊ शकत. कागदाच्या कपमध्ये गरम चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. गरम पेयांच्या संपर्कात येऊन पेपर कपमध्ये वापरलेली रसायने पाण्यात विरघळू शकतात आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. कागदाच्या कपमध्ये चहा पिण्याचे तोटे जाणून घ्या…

पोटाच्या समस्या

कागदापासून बनवलेले कप आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. खरंतर, जेव्हा चहा कागदाच्या कपमध्ये ओतला जातो तेव्हा त्यात रसायने विरघळतात. ज्या रसायनांपासून हा पेपर कप तयार केला जातो आणि जेव्हा तुम्ही ते प्याल तेव्हा ती रसायने तुमच्या पोटातही जातात, ज्यामुळे अपचन आणि अतिसार सारख्या समस्या उद्भवू शकतात.

टॉक्सिन्स

पेपर कपसाठी वापरले जाणारे केमिकल्स आपल्या शरीरात जावून टॉक्सिन्स जमा होऊ शकतात. जे शरीरात स्लो पॉयझनसारखे काम करू शकते.

किडनीवर परिणाम

कागदी कपमध्ये चहा प्यायल्याने किडनीवर परिणाम होतो. शरीरात जमा होणारे विषारी पदार्थ थेट मूत्रपिंडांवर परिणाम करतात. त्यामुळे भविष्यात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणून, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि वेळीच पेपर कपचा जास्त वापर टाळा.

कर्करोगाचा धोका वाढतो

कागदाच्या कपमध्ये गरम चहा पिणे सुरक्षित नाही. या कपमध्ये अनेकदा हानिकारक रसायने वापरली जातात, जी गरम पेयांमध्ये विरघळू शकतात आणि शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. कागदी कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही रसायनांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

रसायने

कागदाचे कप सुरक्षित ठेवण्यासाठी कार्बडिझम नावाचे कीटकनाशक-बुरशीनाशक वापरले जाते. गरम पेयांमध्ये ही रसायने विरघळू शकतात आणि शरीरात प्रवेश करू शकतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News