वास्तुशास्त्रात व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उपाय सांगितलेला आहे. आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थितीत यश मिळवण्याबद्दल असो किंवा अभ्यासाच्या क्षेत्रात चांगले स्थान मिळवण्याबद्दल असो, वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, जे एखाद्या व्यक्तीचे जीवन आनंद आणि समृद्धीने भरू शकतात. जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि कामगिरीत मागे पडत असेल, तर वास्तुदोष हे यामागचे एक मोठे कारण असू शकते. सोप्या उपायांनी तुम्ही हे वास्तुदोष कसे दूर करू शकता ते जाणून घेऊया जेणेकरून तुमचे मूल अभ्यासात नेहमीच अव्वल राहील.
अभ्यासाची खोली
जर मुलाला अभ्यासात रस नसेल तर, वास्तूप्रमाणे अभ्यासाची खोली पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला अभ्यासाची खोली असावी. या दिशा सकारात्मक ऊर्जा देतात. जेव्हा तुमचे मूल अभ्यास करायला बसेल तेव्हा त्याचे तोंड पूर्व दिशेकडे असले पाहिजे.

देवी सरस्वतीचे चित्र किंवा मूर्ती असावी
मुलांच्या अभ्यास खोलीच्या ईशान्य दिशेला देवी सरस्वतीचे चित्र किंवा मूर्ती असावी. सरस्वती ही विद्येची देवी मानली जाते,म्हणूनच सरस्वती देवीचं चित्र खोलीत ठेवलं पाहिजे. वास्तू नुसार सरस्वतीचा फोटो विद्यार्थी अभ्यास करतेवेळी मूल पाहतील अशा ठिकाणी ठेवा. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत हिंसक चित्रे कधीही लावू नयेत.
स्टडी टेबल भिंतीजवळ न ठेवणे
स्टडी टेबल उत्तर किंवा पूर्व दिशेकडे ठेवा, कारण या दिशांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. स्टडी टेबल भिंतीजवळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, ज्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. स्टडी टेबलवर फक्त अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंनाच ठेवा. त्यामुळे टेबल स्वच्छ आणि व्यवस्थित दिसेल. अभ्यास करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे.
अभ्यासाच्या खोलीचा रंग
अभ्यासाच्या खोलीत हलका पिवळा, गुलाबी किंवा हिरवा रंग वापरावा. या रंगांमुळे मुलाची बौद्धिक क्षमता आणि स्मरणशक्ती वाढते. गडद रंगांमुळे मुलांना त्रास होतो आणि त्यांचं वारंवार लक्ष विचलित होऊ शकतं. खोली नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवावी.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)