महाराष्ट्रात मान्सून दाखल, हवामान खात्याचा दावा काय?

पश्चिमेकडून येणार थंडगार वारे महाराष्ट्राच्या अरबी समुद्रात संकलन होत आहे. बाष्पीभवन तयार होऊन ढग निर्माण होतात आणि मग पावसाची स्थिती निर्माण होते. पण सध्या राज्यात मान्सून दाखल झाला असून शेतीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान तज्ञाने म्हटलं आहे.

State Rain – पावसाबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून राज्यातील काही भागात सुसाट्याचा वादळी वारा आणि गारपीठसह पावसाने दमदार हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासासाठी मेघर्जनसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. असं मुंबई वेधशाळेतील हवामान तज्ञांनी दावा केला आहे.

शेतकऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती…

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता अनुकूल परिस्थिती आहे. सातारा , कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई येथे पाऊस सक्रिय झाला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अशी माहिती कुलाबा वेधशाळा अधिकारी नीता एस. टी. मनाई यांनी दिली आहे.

शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान …

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं उत्तर महाराष्ट्र, कोकण, प. महाराष्ट्र या ठिकाणी हाता तोंडाशी आलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. मुसळधार पावसाच्या हजेरीमुळं राज्यातील विविध भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात केळी, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचं मोठे नुकसान झाले आहे. तर नाशिकमध्ये द्राक्षे, कांद्याचे नुकसान झालेय. तर कोकणाच आंब्याचे मोठे नुकसान झालेय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुले लोकांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News