किल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन 9 जूनपासून सुरू, 6 दिवसात कुठे फिरता येणार जाणून घ्या…

मराठा पर्यटन ट्रेन 9 जूनपासून सुरू होत आहे, जी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांना जोडेल. या प्रवासात रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळगड यांसारख्या प्रमुख स्थळांचा समावेश असेल.

महाराष्ट्रातील किल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन येत्या 9 जूनपासून सुरू होणार आहे. जी किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांना जोडेल. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई आणि पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचे दर्शन आता घेता येणार आहे.

कुठे फिरता येणार?

या टूरमध्ये पर्यटकांना किल्ले रायगड, पुणे परिसरातील लाल महाल, कसबा गणेश मंदिर, शिवसृष्टी, किल्ले शिवनेरी, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग मंदिर, किल्ले प्रतापगड, कोल्हापूरची अंबाबाई मंदिर आणि किल्ले पन्हाळगड यांसारखी ठिकाणे दर्शनासाठी उपलब्ध असतील. ही सहल ६ दिवसांची असेल आणि त्यात अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळे पाहिली जातील.

असे असेल नियोजन

सहलीचा मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई येथून प्रवास सुरू होईल. दुसरा दिवस (10 जून) शिवनेरी किल्ला आणि पुणे शहर. तिसरा दिवस (11 जून) प्रतापगड आणि लाखोली, पुणे. चौथा दिवस (12 जून) रायगड आणि लोणावळा. पाचवा दिवस (13 जून) पन्हाळगड आणि कोल्हापूर. सहावा दिवस (14 जून) प्रवास संपवून मुंबईकडे परतणे. पॅकेजमध्ये स्लीपर, एसी तृतीय श्रेणी, एसी द्वितीय श्रेणीतून प्रवासाची सोय आणि हॉटेलमध्ये मुक्कामाची सुविधा आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News