पंजाबमध्ये विषारी दारू सेवनामुळे १४ जणांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती गंभीर

पंजाबच्या मजीठा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये विषारी दारू प्यायल्याने एक डझनाहून अधिक मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Drinking Spurious Liquor in Punjab : पंजाबमधील अमृतसरच्या अनेक गावांमध्ये विषारी दारू पिल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोबतच यात ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. अमृतसरच्या थारयेवाल, मरडी आणि भंगाली या गावांमध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या विषारी दारूमुळे एक डझनाहून अधिक मजुरांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई करत मुख्य आरोपी प्रभजीत सिंह याला अटक केली आहे.

बनावट दारू विकणाऱ्या आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभजीत सिंह हा बनावट दारू पुरवणारा मास्टरमाइंड आहे. या प्रकरणी कलम १०५ BNS आणि ६१A एक्साइज अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती अमृतसर ग्रामीणचे एसएसपी यांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कुलबीर सिंह उर्फ जग्गू (मुख्य आरोपी प्रभजीतचा भाऊ), साहिब सिंह उर्फ सराय, गुर्जत सिंह आणि निंदर कौर यांचा समावेश आहे.

पोलीस संपूर्ण बनावट दारूच्या नेटवर्कची चौकशी करत आहेत. तसेच, पंजाब सरकारकडून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आप सरकारने स्पष्ट केले आहे की दारू माफियांना माफ केले जाणार नाही.

पोलिसांनी काय सांगितले

या प्रकरणावर बोलताना अमृतसरच्या डिप्टी कमिश्नर साक्षी साहनी यांनी सांगितले, की “हे प्रकरण पंजाबमधील मजीठा भागातील आहे. काही लोकांनी येथे विषारी दारूचे सेवन केले होते आणि रात्रीपासूनच आम्हाला ५ गावांमधून माहिती येत होती, की लोकांची प्रकृती खराब होत आहे. यावर आम्ही तात्काळ आमच्या वैद्यकीय टीमला बोलावले आणि सध्या देखील आमची मेडिकल टीम घरोघरी जाऊन तपास करत आहे.”

या घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सरकारकडून पूर्ण मदत केली जात आहे. आमची टीम लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची तपासणी करत आहे.”

पुढे त्यांनी सांगितले, “ही दारू ज्या ठिकाणावरून घेतली गेली होती किंवा जे डिस्ट्रीब्यूटर होते किंवा ज्यांनी ती पुरवली होती, त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे आणि उर्वरित तपास सुरू आहे. याशिवाय रिकव्हरीही केली जात आहे. तसेच गावातच लोकांना वैद्यकीय मदत दिली जात आहे.”


About Author

Rohit Jernavare

Other Latest News