SIP चा १२-१२-२५ फॉर्म्युला नेमका आहे तरी काय? तरुणांना बनवेल करोडपती, संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

लाँग टर्म इंवेस्टमेंटसाठी म्युट्युअल फंड एसआयपी एक शानदार आणि प्रभावशाली इन्व्हेस्टमेंट टूल मानले जाते.

SIP Calculator : फायनान्शियल तज्ज्ञ नेहमी म्हणतात, की भविष्यासाठीची तयारी लवकर सुरू केली, तर त्याचा फायदा अधिक मिळतो. आजच्या काळात नोकरी करणारे अनेक तरुण त्यांच्या पगारातील एक हिस्सा बाजूला ठेवून गुंतवणूक करायला सुरुवात करत आहेत.

जर तुम्हीही तरुण आहात आणि भविष्यातील गरजांसाठी एक मोठा फंड तयार करायचा विचार करत असाल, तर आम्ही इथे तुम्हाला गुंतवणुकीच्या एका उत्तम मार्गाबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही करोडपती होऊ शकता. इथे आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीच्या १२१२२५ फॉर्म्युलाबद्दल माहिती देणार आहोत.

SIP चा १२-१२-२५ फॉर्म्युला

म्युच्युअल फंड एसआयपी हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट आणि प्रभावी गुंतवणूक साधन मानले जाते. तुम्ही जितक्या लवकर एसआयपी सुरू कराल आणि जितका जास्त काळ तो सुरू ठेवाल तितके जास्त फायदे मिळतील.

एसआयपीच्या १२-१२-२५ फॉर्म्युलामध्ये-

  • पहिल्या १२ चा अर्थ आहे – दरमहा १२,००० ची एसआयपी सुरू करणे,
  • दुसऱ्या १२ चा अर्थ आहे – दरवर्षी सरासरी १२% परतावा (रिटर्न) अपेक्षित ठेवणे.
  • आणि यातील २५ चा अर्थ आहे, तुम्ही ही गुंतवणूक वयाच्या २५ व्या वर्षापासून सुरू केली पाहिजे.

या फॉर्म्युलानुसार, जर तुम्ही २५ व्या वर्षी दरमहा १२००० गुंतवायला सुरुवात केली आणि तुम्हाला सरासरी १२% वार्षिक परतावा मिळत राहिला, तर पुढील २५-३० वर्षांत तुम्ही करोडपती होऊ शकता.

तुम्ही २५ वर्षांत २ कोटी जमा करू शकता

जर तुम्ही SIP च्या १२-१२-२५ फॉर्म्युला वापरून गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही २५ वर्षांच्या कालावधीत २.०४ कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा तुम्ही ५० वर्षांचे असाल तेव्हा तुमच्याकडे २ कोटी रुपयांचा निधी असेल.

म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की त्यात शेअर बाजारातील जोखीम खूप असते. यासोबतच, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की SIP मधून मिळणाऱ्या परताव्यावर तुम्हाला भांडवली नफा कर देखील भरावा लागेल. यामुळे अशा बाबतीत दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे आणि गुंतवणुकीत सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.

 

 

 

 

(या बातमीत केवळ सूचना देण्यात आलेली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.)


About Author

Rohit Jernavare

Other Latest News