टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट पोहोचला मथुरेत, ७ मिनिटांच्या भेटीत प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

२०२३ आणि २०२५ नंतर विराट कोहली तिसऱ्यांदा मथुरेत प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आला होता. यावेळी बराच वेळ त्यांनी प्रेमानंद महाराज यांच्याशी चर्चा केली.

मथुरा- टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं काल (12 मे) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी विराच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासह मथुरेत वृदांवनात पोहचला. दोघांनीही एकत्रित प्रेमानंद महाराजांच्या कुंज आश्रमात उपस्थिती लावली. प्रेमानंद महाराजांना त्यांनी साष्टांग दंडवतही घातला.

प्रेमानंद महाराजांनी विराट आणि अनुष्काला विचारणा केली की, आनंदी आहात का, यावर हसून विराटनं हो असं उत्तर महाराजांना दिलं. प्रेमानंद महाराजांनी दोघांना आशीर्वाद दिला- जा, खूप आनंदात राहा, नाम घेत राहा. अनुष्कानं यावर महाराजांना विचारणा केली की, महाराज नामाचा जप केल्यानं सगळ्या इच्छा पूर्ण होतील, त्यावर प्रेमानंद महाराजांनी हो, नक्कीच होतील. असा आशीर्वाद या दोघांना दिला.

प्रेमानंद महाराज आणि विराच-अनुष्कात किती वेळ चर्चा

विराट आणि अनुष्का मथुरेच्या रेडिसन हॉटेलमध्ये उतरले आहेत. दोघंही सकाळी ७.२० च्या सुमारास प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहचले. या दोघांनीही प्रेमानंद महाराज यांच्याशी सुमारे सात मिनिटं एकांतात चर्चा केल्याचं सांगण्यात येतंय. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या वतीनं या भेटीचा व्हिडीओ जारी करण्यात आलाय.

विराट अनुष्का दोन तास होते आश्रमात

प्रेमानंद महाराजांच्या भेटीनंतर महाराज निघून गेले, त्यानंतर सुमारे दोन तास विराट आणि अनुष्का हे दोघंही आश्रमात थांबले होते. सकाळी साडे सातच्या सुमारास आश्रमात गेलेल्या विराट आणि अनुष्कानं सकाळी ९.४० वाजता आश्रम सोडला. या दोन तासांत आश्रमातील कामकाजाची माहिती त्यांनी आश्रमातल्या सेवकांकडून जाणून घेतली.

भगवंताच्या कृपेनं आतलं चिंतन बदलेल-महाराज

प्रेमानंद महाराज विराट आणि अनुष्काला म्हणाले, वैभव मिळणं ही कृपा नाही. ते पुण्य आहे. भगवंताच्या कृपेनं आतलं चिंतन बदलायला हवं. यातून अनंत जन्माचे पाप भस्म होतात आणि नवा जन्म उत्तम मिळतो.

भगवंत जेव्हा कृपा करतो तेव्हा तो संतांचा सहवास देतो. दुसऱ्या कृपेत भगवंत विपरीत परिस्थितीही देतो आणि आतला एक रस्ताही दाखवतो. प्रतिकूलतेशिवाय संसारातील मन बाहेर पडत नाही. आज जेही महापुरुष आहेत त्यांनाही प्रतिकूल स्थितीतून जावं लागलंच. प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हा आनंदी राहा आणि समजा की भगवंताची कृपा होतेय.

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News