दहावीचा निकाल लागला, आता पुढे काय? उज्ज्वल भविष्यासाठी या कोर्सेसचा एकदा विचार करा, पाहा

Diploma Courses After 10th : आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. जे विद्यार्थी पास झाले आहेत, ते आता आपल्या करिअरच्या दृष्टीने योग्य कोर्सची निवड करतील. उज्ज्वल भविष्यासाठी योग्य करिअर पर्याय निवडतील. जर तुम्हाला १०वी नंतर चांगली नोकरी मिळवायची असेल, तर काही कोर्सेस खूपच लोकप्रिय आहेत, जे तुम्ही १०वी नंतर करू शकता आणि एक सुवर्ण भविष्याच्या दिशेने वाटचाल करू शकता.

आईटीआय (ITI)

१०वी नंतर विद्यार्थी आयटीआय (ITI) कोर्स करू शकतात. आयटीआय कोर्समध्ये मशीनिस्ट, मोटर मेकॅनिक, वायरमन, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर अशा प्रकारची कामे शिकवली जातात. हे कोर्सेस ६ महिन्यांपासून २ वर्षांपर्यंतच्या कालावधीचे असतात. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही खासगी तसेच सरकारी नोकरीसाठी पात्र होता.

कंप्युटर अ‍ॅप्लिकेशन डिप्लोमा (DCA)
१०वी नंतर तुम्ही कंप्युटर अ‍ॅप्लिकेशन (DCA) डिप्लोमा करू शकता. या कोर्सची कालावधी १ ते २ वर्षांची असते. या कोर्समध्ये तुम्हाला MS Office, Tally, बेसिक प्रोग्रॅमिंग, इंटरनेट टूल्स याबाबत शिकवले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कंप्युटर ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, क्लार्क यांसारख्या विविध नोकऱ्या मिळवू शकता.

हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स

१०वी नंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट सध्या खूप मागणीत आहे. या कोर्समध्ये फूड प्रिपरेशन, हाउसकीपिंग, हॉटेल फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही सहजपणे एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी करू शकता. या कोर्सनंतर तरुणांना चांगला पगार मिळतो.

ग्राफिक डिझायनिंग

या कोर्समध्ये तुम्ही कंप्युटर ग्राफिक्स, व्हिज्युअल आर्ट्स, लोगो डिझाईन आणि डिझाइन सॉफ्टवेअर कौशल्ये शिकू शकता. ही कौशल्ये शिकल्यानंतर तुम्ही फ्रीलान्सिंग करूनही चांगले पैसे कमवू शकता.

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंगद्वारे तुम्ही डिजिटल मार्केटिंग टूल्स, सोशल मीडिया अ‍ॅडव्हर्टायझिंग, ईमेल मार्केटिंग आणि अन्य ऑनलाइन मार्केटिंग शिकू शकता. आजच्या काळात या क्षेत्राची मागणी झपाट्याने वाढत आहे. या कोर्सचा कालावधी ३ महिन्यांपासून १२ महिन्यांपर्यंत असू शकते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तरुणांना चांगला पगार मिळतो.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News