लाडक्या बहिणींचा संसार उध्वस्त हेच सरकारचे धोरण, दारु दुकाने परवान्याविरोधात विरोधकांचे जोरदार आंदोलन

लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करणाऱ्या दारु दुकाने परवाने देण्याच्या धोरणा विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.

Mansoon Session : आज मंगळवारी विरोधक आक्रमक होत महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन केले. पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरु आहे. या आठवड्यात विधानसभा विरोधी पक्षनेता याची निवड होण्याची शक्यता आहे. तर हा अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरु आहे. दरम्यान, आज विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

जनसामान्यांच्या विरोधात सरकारचे धोरण…

दरम्यान, निवडणुकीत राज्याची तिजोरी रिकामी करणाऱ्या सरकारने आता महसूल वाढीसाठी १९७२ पासून बंदी असलेले मद्य परवाने देण्याचा  निर्णय घेतला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करणाऱ्या दारु दुकाने परवाने देण्याच्या धोरणा विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. महायुती सरकारने मद्य परवाने देऊन जनजीवन विस्कळीत करणारे धोरण आखले आहे. अशी घणाघाती टिका विरोधकांनी करत सरकारच्या विरोधात महायुती सरकारचे करायचे काय…खाली डोकं वर पाय…अशी घोषणाबाजी केली.

दारूवाल्या सरकारचा धिक्कार असो…

दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करत असल्याची गंभीर टीका राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. बाटलीवाल्या सरकारचा धिक्कार असो… दारूवाल्या सरकारचा धिक्कार असो… दारूला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.. दारूचा व्यवसाय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या… तसेच  सभागृहात देखील विरोधक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News