अंतराळवीर शुभांशू शुक्ला 18 दिवसांनंतर पृथ्वीवर परतले, कॅलिफॉर्नियाच्या समुद्रात स्पेसक्राफ्टचं लँडिंग

शुभांशू यांच्या रुपानं 41 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीरानं आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये पाऊल ठेवलंय. संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची  बाब मानण्यात येतेय. 

कॅलिफोर्निया-अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर स्पेस सेंटरमध्ये 18 दिवस राहिल्यानंतर मंगळवारी पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. सुमारे 23 तासांच्या प्रवासानंतर ड्रॅगन स्पेसक्राफ्टचं कॅलिफॉर्नियाच्या समुद्र किनाऱ्याजवळ लँडिंग झालं. सोमलारी संध्याकाळी 4.45 वाजता या चारही अंतराळवीरांनी परतीचा प्रवास सुरु केला होता.

हे सगळे अंतराळवीर 26 जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजता आंतररराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये पोहजले होते. 25 जूनला त्यांनी कैनेडी स्पेस सेंटरमधून अंतराळात झेप घेतली होती. शुंभाशू यांच्यासह चारही अंतराळवीर परतल्यानंतर त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. शुभांशू शुक्ला यांच्या  आई वडिलांच्या डोळ्यात मुलगा सुखरुप परतल्याचं  पाहून आनंदाश्रू पाहायला मिळाले.

शुभांशू परतल्यानंतर पंतप्रधानांकडून कौतुक

शुभांशू शुक्ला सुखरुप परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. संपूर्ण देशासह ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या ऐतिहासिक अंतराळ यात्रेनंतर पृथ्वीवर परतल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो, असं मोदी म्हणालेत. शुभांशू यांनी त्याग आणि साहस दाखवत अब्जावधी भारतीयांना प्रेरित केलं असल्याचंही पंतप्रधान म्हणालेत. भारताच्या गगनयान योजनेसाठी शुभांशू यांची अंतराळयात्रा मैलाचा दगड असल्याचंही पंतप्रधान म्हणालेत.

18 दिवसांत शुभांशू यांनी काय केलं?

शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये 18 दिवसांच्या काळात 60 पैक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोगात सहभाग नोंदवला. यात भारतातील सात प्रयोगांचा समावेश होता. मेथी आणि मुगाचं बियाणं त्यांनी अवकाशात उगवून पाहिलं. स्पेस मायक्रोलॉजीच्या प्रयोगातही त्यांनी सहभाग नोंदवला. अंतराळात हाडांवर प्रकृतीचा होणारा परिणामही जाणून घेतला.

28 जून रोजी त्यांनी स्पेस सेंटरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉनपर्नसवरुन संदाव साधला. अंतराळातून भारत भव्य दिसत असल्याचं त्यावेळी त्यांनी मोदींना सांगितलं. 3, 4 आणि 8 जुलैला तिरुअनंतपूरम, बंगळरु आणि लखनौतील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांनी हॅम रेडिओच्या माध्यमातून संवाद साधला. 6 जुलै रोजी त्यांनी स्पेस सेंटरमधून इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन आणि इतर वरिषअठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात त्यांनी केलेले प्रयोग आणि गगनयान मोहीमेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या सगळ्यात त्यांनी अंतराळातून पृथ्वीचे आणि भारताचे काही फोटोही काढले आहेत.

शुभांशू यांच्या रुपानं 41 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीरानं आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये पाऊल ठेवलंय. संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची  बाब मानण्यात येतेय.

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News