अखेर टेस्ला मुंबईत, कारच्या शोरुमचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, कोणतं मॉडेल, किती किंमत, घ्या जाणून

टेस्ला कारच्या वाय मॉडेलच्या कार बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. 15 जुलैपासून या कारचं बुकिंगही सुरु झालेलं आहे. वाय मॉडेल कारची दोन व्हेरियंट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मुंबई- जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची इलेक्ट्रिकत कार अखेर भारतात मुंबईत लाँच झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीकेसीत पहिल्या शोरुमचं उद्घाटन करण्यात आलंय.

अमेरिकेत लोकप्रिय ठरलेल्या टेस्ला कारचं भारतात लाँचिंग झाल्यानंतर आता कोणतं मॉडेल त्यांनी भारतात आणलंय आणि त्याची किंमत आणि वैशिष्ठ्ये काय आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.

सध्या केवळ टेस्लाचे वाय मॉडेल बाजारात

ऑटो ड्राईव्ह फीचरमुळे, स्टनिंग लूकमूळे चर्चेत राहिलेल्या टेस्ला कारच्या वाय मॉडेलच्या कार बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. 15 जुलैपासून या कारचं बुकिंगही सुरु झालेलं आहे. वाय मॉडेल कारची दोन व्हेरियंट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कारची किंमत 60 लाखआंपासून पुढे असणार आहे. तर दुसऱ्या कारची किंमत 67.89 लाख इतकी असेल. ऑक्टोबरपासून या कारची डिलिव्हरी मिळणार आहे.

कारच्या व्हरिएंटची किंमत काय?

1. रियल व्हील ड्राईव्ह
एक्स शोरुम किंमत- 59,89,000 रुपये
ऑन रोड किंमत- 61,95,640 रुपये
अमेरिकेतील किंमत- 32,00,000 रुपये
भारतात महाग- 27,89,000रुपये

2. लाँग रेंज व्हील ड्राईव्ह
एक्स शोरुम किंमत- 67,89,000 रुपये
ऑन रोड किंमत- 69,15,190 रुपये
अमेरिकेतील किंमत- 35,00,000 रुपये
भारतात महाग- 32,89,000रुपये

रियल व्हील ड्राईव्ह की कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमी अंतर पार करेल असा दावा करण्यात आलाय. तर लाँग रेंज व्हील ड्राईव्ह कार चार्गिंनंतर 622 किमी अंतर पार करेल असं सांगण्यात येतंय.

सेल्फ ड्राईव्ह मोडसाठी अधिकचे सहा लाख रुपये भारतात मोजावे लागणार आहेत. खरेदीवेळी 21 लाख रुपये केवळ आयात कर मोजावा लागणार आहे. मॉडेल 3 आणि मॉडेल S सोबतच सायबरट्रकसारखे पर्यायही भविष्यात उपलब्ध केले जाऊ शकतात.
मुंबईनंतर लवकरच टेस्ला दिल्लीत शो रूम सुरू करण्याच्या तयारीत आहे

सुपर चार्जर हे आकर्षण

शो रूमपाठोपाठ टेस्लानं मुंबईत सुपर चार्जरही लॉंच केलाय. अवघी 15 मिनिटं सुपर चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 200 किलोमीटर चालते. सुपर चार्जर हे टेस्लाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणाराय.

देशाच्या कार मार्केटवर होणार परिणाम

कारसाठी जगातील तिसरी मोठी बाजारपेठ अशी भारताची ओळख आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्सची मागणीही भारतात वाढतेय. पर्यावरणासाठी सरकारही ईव्हीला अधिक सुविधा उपलब्ध करुन देतेय. टेस्ला भारतात आल्यानं हा पर्यायही आता ग्राहकांसाठी खुला असेल. केवळ आयात शुल्कामुळे वाढलेली रक्कम ही चिंतेची बाब असणार आहे.

टेस्लाच्या शो रुमसाठी घेतलेल्या जागेचंच भाडं दरमहा ३५ लाख रुपये आहे. भारतात टेस्लाची स्पर्धा टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या स्थानिक दिग्गज कंपन्यांसोबत असेल. याशिवाय बीवाईडी, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिज सारख्या फॉरेन ब्रँडशी सुद्धा आता टेस्लाची स्पर्धा असेल. या स्पर्धेत टेस्ला बाजी मारणार का, हे पहावं लागेल.


About Author

Smita Gangurde

Other Latest News