आनंदाची बातमी! कोकणात गणपती सणासाठी एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार, बुकिंग कसे करता येणार?

यात महिला व ज्येष्ठांना सवलत असणार आहे. जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणासह गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. 

ST Buses for Ganpati Festival : गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रासह कोकणात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जातो. या सणासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई, पुण्यावरुन कोकणात जातात. याच धरतीवर परिवहन विभाग महामंडळातर्फे यंदा ५००० एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

कधीपासून बुकिंग होणार?

दुसरीकडे गेल्यावर्षी ४३०० जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यानंतर यावर्षी ५००० जादा बसेस गाड्या सोडण्यात येणार आहेत. ह्या गाड्या २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे आणि पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, २२ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. आषाढी एकादशीच्या वारीसाठी एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. म्हणून आता गणपती उत्सवासाठी एसटीने तब्बल ५००० जादा बसेस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

तिकिट बुकिंग कसे करता येणार?

दरम्यान, गणपती उत्सव म्हणजे कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणपतीचा सण, कोकणचा चाकरमानी आणि एसटीचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. म्हणून यंदाही या सणासाठी साधारण ५००० जादा एसटीच्या बसेस गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असं परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

दरम्यान, या गाड्यांचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे. तसेच बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation या ॲपव्दारे देखील आरक्षण करता येणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News