मुंबई- उद्धव आणि राज ठाकरे बंधूंची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती होणार की नाही? याबाबत सस्पेन्स वाढलाय. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान राजकीय परिस्थिती बघूनच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलीय. तर दुसरीकडे वाढदिवसानिमित्त सामनाला दिलेल्या मुलाखतीत आता राजही सोबत आल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी युतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय.
मराठी विजयी मेळाव्यातही राज ठाकरे आता सोबतच असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं. राज ठाकरेंनी मात्र त्यानंतर याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. निवडणुकांवेळी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ते सांगत असले तरी उद्धव ठाकरेंकडून मात्र युती असल्याचं जाहीरपणे सांगण्यात येतंय. यातच एक सर्व्हे समोर आला आहे.

ठाकरे एकत्र आल्यास मोठं यश-सर्व्हे
संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला एक सर्वे समोर आलाय
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईत 100पेक्षा जास्त जागा जिंकतील, यात मनसे 25 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा अंदाज आहे
१. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्येक वॉर्डात सर्व्हे करण्यात आला.
२. यात ठाकरे बंधूंची युती मुंबईत 100 पेक्षा
जास्त जागा जिंकतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.
३. एकत्र लढसल्यास मनसेला 25पेक्षा
जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
४. ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर सर्वाधिक
नुकसान मनसेचं होईल, असंही भाकित वर्तवण्यात आलंय.
५. स्वतंत्र लढल्यास मनसेला 10 च्या आत,
तर उबाठाला 60 ते 65 जागा
मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
६. ठाकरे बंधू एकत्र न आल्यास मुंबई
महापालिकेत सत्ता राखण्यात अपयश येईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
७. मराठी मतांचं विभाजन न झाल्यास दोघांना
100चा पल्ला पार करणं अवघड नाही, असा निष्कर्ष काढण्यात आलाय.
राजकीय वर्तुळात मत मतांतरं
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत इगतपुरीत मनसेचं तीन दिवसीय चिंतन शिबिर सुरु आहे
यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना राज ठाकरेंनी युतीबाबत मोठं विधान केलंय विजयी मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच मर्यादित होता. त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असं स्पष्ट करत ठाकरेंच्या शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या सबुरीचा सल्ला दिलाय याच वक्तव्याचा धागा पकडत उद्योग मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंनी महायुतीत येण्याची ऑफर देऊन टाकली
तर संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलंय. औपचारिक जे बोलायचे ते आम्ही लवकरच बोलू , आम्ही आशावादी आहोत, महाराष्ट्र हिताचा निर्णय घ्यायचा तो राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील. कार्यकर्त्यांच्या पावसाला आम्ही वेगळी दिशा देऊ त्यांना योग्य दिशा देऊ, असं राऊत म्हणालेत.
एकत्र राहतील का साशंकता- आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे एकत्र आले असले तरी ते एकत्र राहतील का नाही याची कल्पना नाही. असं विधान केलंय., मुंबईच्या महापालिकेत एकत्र येणार अशी चर्चा आहे. पण ते नक्की येतील की नाही सांगता येत नाही. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातील असे वाटत नाही. मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकत्र आले परंतु राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यासोबत राजकीय भागीदारी करू नये. मराठीचा मुद्दा आता संपलेला आहे.
दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा आग्रह
2017 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते तेव्हा शिवसेना 84, भाजपा 82 आणि मनसे 7 जागा जिंकल्या होत्या
सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे 50 पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत
मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेंची शिवसेने निष्प्रभ ठरतील असं दिसतंय
त्यामुळं यावेळी मनसेचे कार्यकर्तेही ठाकरे शिवसेनेसोबतच्या युतीसाठी उत्सुक आहेत
मराठी मतांचं विभाजन टळणार?
मुंबईतील मराठी मते हा शिवसेनेचा मुख्य आधार आहेमात्र आता ठाकरे गटाबरोबर शिंदेंची शिवसेना आणि मनसे मराठी मतांचे 3 वाटकेरी झालेत. त्यामुळे मराठी मतांसाठी उध्दव ठाकरे यांना मनसे सोबतची युती हवी आहे. त्यासाठी मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासह त्यांचे नेते मराठी मतांसाठी एकत्र राहिले पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडत आहेत
मात्र राज ठाकरे यांनी युतीबाबत सस्पेन्स कायम ठेवल्याचं दिसतंय.