लक्ष्मी नारायण मंदिराला हात लावला तर बिल्डराला पाय टाकू देणार नाही; आदित्य ठाकरेंचा बिल्डर आणि सरकारला इशारा

पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे आमचे पदाधिकारी पाहतील, असेही त्यांनी नमूद केले. हे मंदिर तोडू द्यायचं नाही. तुम्ही पालिका आणि बिल्डरशी चर्चा करा मी मध्ये पडणार नाही. पण जर मंदिर पाडत असतील तर तुमच्यामागे ठामपणे भिंत म्हणून आम्ही राहू, असे ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray : मुंबईतील आर्थर रोड येथील मेघवाडीतील जुन्या स्वामी नारायण मंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला आहे. येथे खासगी बिल्डर घुसकोरी करत आहे. खासगी बिल्डरकडून या परिसराचा पुनर्विकास केला जात असताना, १९२१ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचे स्थलांतर करण्यास स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज स्थानिकांशी संवाद साधत बिल्डर आणि सरकारला इशारा दिला आहे.

बिल्डरच्या फायद्यासाठी असेल तर…

दरम्यान, काही जणांनी मला भेटून सांगितले की मंदिराच्या स्थलांतरामध्ये काही समस्या नाही. मंदिराला हलवण्याची खरं तर काहीच गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जर मंदिराला हलवत असतील तर तुम्ही बिल्डरशी चर्चा करा. मी त्यामध्ये पडणार नाही. पण जर मंदिराला चर्चा न करता हलवले, तर इथे बिल्डरला पाय ठेऊ द्यायचा नाही, असा सज्जड दम आदित्य ठाकरे यांनी दिला.

बिल्डरच्या फायद्यासाठी असेल तर जो कोणी बिल्डर असो, बिल्डरने मंदिराला हात लावला तर काम करून देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, मेघवाडी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात संवाद साधत असताना स्थानिक, लक्ष्मी नारायण मंदिर समिती सदस्य, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर आणि उपनेत्या किशोरी पेडणेकर, शाखाप्रमुख गोपाळ खाडे, सुनील अहिर आदि उपस्थित होते.

तुमच्यामागे ठामपणे भिंत म्हणून उभे राहू…

आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाजप सरकारवरही निशाणा साधला. भाजपचे सरकार आल्यापासून अशा घटना वाढत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मागच्या वेळेला हनुमान मंदिराला धोकादायक ठरवले, पण ते आपण वाचवले नंतर जैन मंदिर पाडले. आज इथे देखील महत्त्वाचे मंदिर आहे. केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सरकार भाजपचे, पालिकेत मिंधे लाडक्या मित्रासाठी मंदिर पाडली जात आहेत.

पण आताच सांगतोय की मंदिराला हात लावू देणार नाही, असे ते म्हणाले. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे आमचे पदाधिकारी पाहतील, असेही त्यांनी नमूद केले. “हे मंदिर तोडू द्यायचं नाही. तुम्ही पालिका आणि बिल्डरशी चर्चा करा मी मध्ये पडणार नाही तुमच्यामागे ठामपणे भिंत म्हणून आम्ही राहू,” असे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्थानिकांना दिले.


About Author

Astha Sutar

Other Latest News