IPL 2025 : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि डिंपल क्वीन प्रीती झिंटा आयपीएल दरम्यान खूप सक्रिय असतात. दोघेही त्यांच्या संघाचे बहुतेक सामने पाहण्यासाठी मैदानात पोहोचतात. प्रीती स्टँडमध्ये बसून तिच्या संघाला चीयर करताना दिसते. शाहरुख आणि प्रितीच्या संघांनी यंदा उत्तम कामगिरी केली आहे.
आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला खूप पैसे मिळतात. याशिवाय सामना जिंकल्यावर पैसेही मिळतात. सामना जिंकण्यात जर फायदा असेल तर मग हरण्यात तोटादेखील होतो.

शाहरुखच्या संघाने तीन ट्रॉफी जिंकल्या
शाहरुख खान याचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. शाहरुख यातून कोट्यवधी रुपये कमावतो. शाहरुख आणि जुही चावला हे या संघाचे सह-मालक आहेत. पण जेव्हा कोलकाता नाईट रायडर्स सामना हरतो, तेव्हा खूप मोठे नुकसान होते.
प्रीतीच्या टीमची काय अवस्था?
प्रीती झिंटाच्या संघाने आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यांचा संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरला आहे. आता चाहत्यांना आशा आहे, की पंजाब किंग्ज यंदा त्यांची पहिली ट्रॉफी जिंकेल.
सामना हरल्याने किती नुकसान होते?
एखादा संघ मालक सामना हरल्यावर त्याचे किती नुकसान होते ते आपण येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा संघ हरतो तेव्हा त्याचा थेट आकडा सांगणे थोडे कठीण असते. तिकिट विक्री, स्पॉन्सरशिप आणि मीडिया हक्कांमध्ये आयपीएल संघ मालकांचा मोठा वाटा आहे. फ्रँचायझीला ४०-५० टक्के मीडिया हक्क मिळतात. स्पॉन्सरशिपही कमी मिळू लागते. संघ मालकांनाही तिकिट विक्रीच्या ८० टक्के रक्कम मिळते. जर एखादा संघ सतत सामने गमावत राहिला तर त्याची प्रेक्षकसंख्या कमी होते आणि तिकिटेही कमी विकली जातात. त्यामुळे संघ मालकांचे मोठे नुकसान होते.