परेश रावल यांच्याऐवजी पंकज त्रिपाठी ‘बाबू भैया’च्या भूमिकेत दिसणार? खरं काय? जाणून घ्या

Hera Pheri 3 Controversy : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’मधून माघार घेतल्यानंतर, त्यांच्या जागी कोण येणार याबद्दल अटकळ बांधली जात आहे. बाबू भैया या लोकप्रिय पात्रासाठी पंकज त्रिपाठी यांचे नाव सर्वात आधी येत आहे. पण पंकज त्रिपाठी खरोखरच बाबू भैय्याची भूमिका साकारतील का? यावर आता स्वतः अभिनेत्यानेच प्रतिक्रिया दिली आहे.

पंकज त्रिपाठी यांनी काय प्रतिक्रिया दिली?

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, पंकज त्रिपाठी यांना विचारण्यात आले, की सोशल मीडियावर लोक त्यांना ‘हेरा फेरी ३’ मध्ये कास्ट करण्याबद्दल बोलत आहेत. यावर उत्तर देताना अभिनेत्याने सांगितले, की तो कधीही स्वतःला परेश रावल यांच्या बरोबरीचे मानत नाहीत.

पंकज म्हणाले, की ‘मी लोक काय म्हणत आहेत ते ऐकले आणि वाचले, पण मी स्वतःला त्या भूमिकेसाठी पात्र मानत नाही. परेशजी एक उत्तम कलाकार आहेत. त्यांच्यासमोर मी काहीच नाही.

बाबू भैय्यासाठी पंकज त्रिपाठी यांचे नाव सर्वात वर

पंकज त्रिपाठी यांच्या कॉमिक टायमिंग आणि अभिनयाचे कौतुक झाले असले तरी, बाबू भैयाच्या व्यक्तिरेखेचे ​​प्रेक्षकांमध्ये एक वेगळेच भावनिक नाते आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर चाहते परेशऐवजी पंकज त्रिपाठींचे नाव घेत आहेत, ज्यांच्याकडे ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारण्याची क्षमता आहे.

परेश रावल यांनी सोडला ‘हेरा फेरी ३

परेश रावल अचानक ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडल्यामुळे सध्या खूप चर्चा सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार यांच्या प्रोडक्शन कंपनीने परेश रावल यांच्यावर तब्बल २५ कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.

यात आरोप असा आहे, की परेश रावल यांनी चित्रपट साइन केल्यानंतर अचानकच शूटिंग अर्धवट सोडून दिले. मात्र, परेश रावल यांनी स्वतः सोशल मीडियावर निवेदन जारी करत स्पष्ट केले की त्यांचे आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आणि त्यांनी स्वतःच्या इच्छेने हा चित्रपट सोडला आहे.

पंकज त्रिपाठी यांची आगामी सिरीज कोणती?

पंकज त्रिपाठी यांनी ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाबद्दल थेट हो किंवा नाही म्हटले नाही, परंतु ते लवकरच ‘क्रिमिनल जस्टिस ४’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. त्याच्यासोबत या मालिकेत झीशान अयुब, मीता वशिष्ठ, सुरवीन चावला आणि श्वेता बसू प्रसाद हे कलाकारही दिसणार आहेत. हा शो २९ मे पासून जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News