चपाती किंवा ब्रेड खाल्यानंतर अनेकदा तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांचे पोट फुगलेले आहे किंवा त्यांना अपचनाचा त्रास होतो आहे. असे होण्यामागचे कारण म्हणजे पीठामध्ये असणारे ग्लूटन. हे ग्लूटन अनेक खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. पण काही लोक हे का टाळतात आणि याचे पर्याय काय असू शकतात, ते जाणून घेऊया.
ग्लूटेन म्हणजे काय?
हे अनेक धान्यांमध्ये आढळणारे एक प्रथिन आहे, विशेषतः गहू, बार्ली, रवा, राईचे धान्य आणि डुरम तृणधान्यांमध्ये हे आढळते. हे अनेक पदार्थांना चावण्यायोग्य बनवते आणि त्यांना आकार देण्यास मदत करते.

यामध्ये ग्लूटेन आढळते
पेस्ट्री
पास्ता
तृणधान्ये
बिअर
सोया सॉस
ग्लूटेनचे फायदे
ग्लूटेन हे गव्हासारख्या काही धान्यांमध्ये आढळते, ज्यामध्ये फायबर, फोलेट आणि इतर पोषक घटक देखील असतात. ग्लूटेन प्रीबायोटिक म्हणून देखील काम करू शकते, जे तुमच्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरियासाठी चांगले आहे.
ग्लूटेनचे काही तोटेही आहेत
ज्यांना ग्लूटेन इनटॉलरेन्स, सेलिआक डिसीज, गव्हाची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी ग्लूटेन त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ज्या लोकांना सेलिआक डिसीज आहे, त्यांचे शरीर ते विषारी पदार्थ म्हणून हाताळते, ज्यामुळे जळजळ होऊ शकते.
ग्लूटेन इन्टॉलरेंस लक्षणे कोणती आहेत?
ग्लूटेन इन्टॉलरेंस कोणालाही असू शकते, परंतु महिलांमध्ये ती अधिक सामान्य आहे. काही लोक जन्मतःच ग्लूटेन असहिष्णुतेसह येतात, परंतु काहींना ते नंतरच्या आयुष्यात विकसित होते. हे गव्हाच्या अॅलर्जीसारख्या अन्न अॅलर्जींपेक्षा वेगळे आहे. ग्लूटेन असहिष्णुता म्हणजे ग्लूटेनची ऍलर्जी असणे असे नाही.
त्याची लक्षणे अशी आहेत
पोटदुखी
अशक्तपणा
चिंता
पोटफुगी किंवा गॅस
ब्रेन फॉग किंवा एकाग्रतेचा अभाव
नैराश्य
अतिसार किंवा बद्धकोष्ठता
थकवा
डोकेदुखी
सांधेदुखी
मळमळ किंवा उलट्या
त्वचेवर पुरळ
जर तुम्ही चुकून ग्लूटेन असलेले अन्न खाल्ले तर
ग्लूटेन अनेक अन्नपदार्थांमध्ये आढळते. जर तुम्ही ग्लूटेन-मुक्त अन्न खात असाल आणि तुम्ही चुकून ग्लूटेन असलेले काहीतरी खाल्ले तर अशा परिस्थितीत तुम्ही काय करावे:-
पोट साफ करण्यासाठी भरपूर पाणी प्या
कमी मिरची किंवा चरबी असलेले जेवण थोडे थोडे खा.
पोटदुखी कमी करण्यासाठी आले किंवा पेपरमिंट चहा प्या.
हे ग्लूटेन मुक्त पदार्थ कोणते आहेत?
बहुतेक दुग्धजन्य पदार्थ, जसे की चीज, लोणी आणि दूध
भाज्या आणि फळे
मांस आणि मासे
बटाटा
भात आणि तांदूळ नूडल्स