Ajit Pawar – ‘टेक वारी’ या कार्यक्रमाचे आयोजन मंत्रालयाच्या प्रांगणात आज करण्यात आले आहे. ही वारी ५ मे ते ९ मे पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार आणि प्रेरणादायी वक्ते गौर गोपालदास यांच्या हस्ते पार पडला. प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळाच्या ऐवजी तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर होत आहे. मंत्रालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नीट काम करा, नाहीतर तुमच्या जागी रोबोटचा वापर होताना दिसेल, असं अजित पवारांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना टोला लगावला.
हा कार्यक्रमाचे अतिशय सुंदररित्या आयोजन करण्यात आले आहे. परंतु कार्यक्रमाचे उद्घाटन करतेवेळी कात्री सापडत नव्हती. पण मी आणि आशिष शेलार आल्यानंतर कात्री पटकन समोर आली.

किमान त्यांचे अंग तरी झाकता आले असते…
दरम्यान, पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कार्यक्रम चांगला होत असताना यात काटकसरी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जे सत्कार केले त्याच्यामध्ये शाल ही टॉवेलपेक्षाही कमी आहे. जरी ही शाल दिली नसती तरी चाललं असतं. आता गौर गोपालदास यांना जी शाल दिली आहे. ती शाल किमान त्यांचं अंग झाकेल एवढी तरी दिली असती तर बरं झालं असतं. असं अजित पवारांनी म्हणताच मंत्रालयाच्या प्रांगणात एकच हशा पिकला.
शत्र आणि अस्त्र…
महायुतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्र आता थांबणार नाही…, विकासापासून कोणी रोखू शकणार नाही…, हे ब्रीद वाक्य आम्ही अंमलात आणले आहे. दुसरीकडे आज तंत्रज्ञान प्रगत आणि गतिमान झाले आहे. गावा-खेड्यातील लोकांनाही सोशल मीडियाच्या आणि तंत्रांच्या माध्यमातून आपले अधिकार आणि हक्क जे आहेत, हे समजले पाहिजेत. आणि त्यांना ते मिळाले पाहिजेत. आज सोशल मीडिया खूप फास्ट आहे. तंतज्ञान हे आज शस्त्र आणि अस्त्र झालं आहे, असं मंत्री शेलार म्हणाले.
कार्यक्रमाची रूपरेषा कशी?
– ५ मे, सोमवारी – तणावमुक्त जीवन जगण्याची कला, यावर प्रेरणादायी प्रसिद्ध वक्ते गौर गोपाल दास यांचे व्याख्यान
– ६ मे, मंगळवारी – श्रीमती मधुरा बाचल, यांचे पाककलेविषयी व्याख्यान
– ७ मे, बुधवारी – डॉ. संतोष बोराडे, जीवन संगीताच्या ज्ञानाने सर्वांना करणार तल्लीन, यावर व्याख्यान
– ८ मे, गुरुवारी – गुरुदेव श्री श्री रविशंकर, ध्यान मार्गान जीवन जगण्याचा पाठ, यावर व्याख्यान