Economic Offences Wing – पावसाळा म्हटलं की, मुंबईची तुंबई होते. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचते. याला कारण म्हणजे मुंबईतील न झालेली व्यवस्थित नालेसफाई. पावसाळ्याला दरवर्षी पालिकेकडून नाले सफाईसाठी कंत्राट काढले जाते. मात्र कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करत असल्यामुळे मुंबईची तुंबत होत असल्याचे प्रत्येक वर्षी चित्र असते. नालेसफाईवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील झाल्याचे पाहयला मिळाले.
दरम्यान, यावर्षीही पावसाला एक दीड महिन्याचा अवधी असताना अजूनही मुंबईतील नालेसफाची कामे व्यवस्थित झाली नाहीत. आता यारून आर्थिक गुन्हे शाखेने पालिकेचे काही अधिकारी आणि नालेसफाई कंत्राटदार यांच्यावर वेगवेगळे आठ गुन्हे दाखल केले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेकडून छापेमारे
या नालेसफाईच्या कामात पालिकेतील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने गैरव्यवहार आणि घोटाळा झाल्याचं आरोप भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी केला होता. या संबंधात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आर्थिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आली असून वरळतील लोटस कोर्ट या इमारतीवर सकाळी आठ वाजल्यापासून छापेमारी केली असून, येथे दुसऱ्या मजल्यावर चौकशी करण्यात येत आहे.
आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण
दुसरीकडे मुंबईत पावसाला सुरुवात होण्याआधी नालेसफाईसाठी करोड रुपयांचा चक्कासुर केला जातो. निविदा काढल्या जातात. कंत्राट दिले जाते. मात्र शंभर टक्के नालेसफाई होत नाही. मात्र पालिका करत असलेल्या नाले सफाईच्या कामावरुन भाजपाचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी याची चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. तसेच यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते.