नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ‘शाही स्नान’ तारखांची घोषणा

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, यावेळी होणाऱ्या शाही स्नानाच्या तारखांची घोषणा आता करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात यासाठी बैठक पार पडली.

नाशिकमध्ये 31 ऑक्टोबर 2026 रोजीपासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. ही महाराष्ट्रातील आणि देशभरातील हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने एक महत्वाची पर्वणी असणार आहे. या सोहळ्यात होणाऱ्या स्नानाला शाही स्नान असे संबोधले जाणार आहे. गोदावरी काठी हा भव्य सोहळा रंगेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक पार पडली, त्यानंतर शाही स्नानाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

कसे असेल नियोजन?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या.

31 ऑक्टोबर 2026 ला ध्वजारोहण शुभारंभ होईल. दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे शाही स्नान तारखा

2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान

31 ऑगस्ट 2027 रोजी दुसरं शाही स्नान

11 सप्टेंबर 2027 रोजी तिसरं शाही स्नान

नाशिक कुंभमेळ्याचे महत्व

नाशिक कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक उत्सव आहे. हा मेळा प्रत्येक १२ वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केला जातो. यावेळी, गंगासमान पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत स्नान केल्याने पापांचे नाश होते आणि मोक्ष प्राप्तीची संधी मिळते. कुंभमेळ्याच्या वेळी शाही स्नान हा मुख्य विधी मानला जातो, ज्यात विविध अखाड्यांचे साधू-संत गोदावरीत स्नान करून धार्मिक अनुष्ठाने पार पडतात. या मेळ्यामुळे नाशिक शहरात धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण बदल घडतात. नागरिक, पर्यटक आणि साधू-संत यांचे एकत्र येणे हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. नाशिक कुंभमेळा भारतीय संस्कृतीचे जतन करणारा आणि जागतिक स्तरावर भारताच्या धार्मिक वारशाचे प्रदर्शन करणारा एक अद्वितीय उत्सव आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News