घरातच बनवा ढाबा स्टाईल दाल तडका, जाणून घ्या सीक्रेट रेसिपी

अनेकांना सतत बाहेर जाऊन खाण्याची सवय असते. त्यामुळेच जर आपण आपल्या घरातच ढाब्यासारखे पदार्थ बनवले तर बाहेर खाण्याची गरजच नाही.

Dhaba Style Dal Tadka Recipe:   तुम्ही घरी अनेकदा डाळ शिजवली असेल. पण तुम्हाला बऱ्याच वेळा असे वाटले असेल की ढाब्यावर बनवलेल्या डाळीचीचव वेगळी आणि अनोखी असते. याचे कारण म्हणजे त्यात वापरलेला मसाला वेगळ्या प्रकारचा असतो.

जर तुम्हालाही तुमच्या घरी ढाब्याची चव हवी असेल तर तुमच्या घरातील डाळीत ढाब्याचा तडका द्या. तुमच्या डाळीची चव द्विगुणित होईल आणि सर्वांना ती खूप आवडेल, चला तर मग जाणून घेऊया ढाबा स्टाईल दाल तडका कसा बनवायचा..

ढाबा स्टाइल दाल तडका साठी साहित्य-

-तूर डाळ – दोन कप
-टोमॅटो – ३ बारीक चिरलेले
-कांदे २ चिरलेले
-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
-धणेपूड – २ चमचे
-हळद – १ टीस्पून
-लाल तिखट – १ टीस्पून
-जिरे – १ टीस्पून
-आले आणि लसूण पेस्ट – १ टीस्पून
-हिंग – १ चिमूटभर
-लाल मिरची – १
-तूप किंवा बटर – २ टेबलस्पून
-मीठ – चवीनुसार

ढाबा स्टाईल दाल तडका बनवण्याची रेसिपी-

-ढाबा स्टाईल दाल तडका बनवण्यासाठी, तुम्हाला फक्त तूर डाळ धुवून काही वेळ भिजवावी लागेल. यानंतर ही डाळ कुकरमध्ये ठेवा. नंतर गरजेनुसार पाणी घाला आणि नंतर हळद, मीठ घाला आणि शिजवण्यासाठी ठेवा.

-डाळ शिजल्यावर गॅस बंद करा आणि खाली उतरवा. नंतर एका पॅनमध्ये एक चमचा तूप टाका आणि गरम होऊ द्या. नंतर कांदा आणि आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या घाला आणि आणखी काही मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो, तिखट आणि धणेपूड घाला आणि मंद आचेवर काही वेळ शिजू द्या.

-यानंतर, या पॅनमध्ये उकडलेली डाळ घाला आणि मंद आचेवर काही वेळ शिजवा. थोडे शिजले की गॅसवरून उतरवा. यानंतर, एका पॅनमध्ये तूप घाला आणि ते गरम झाल्यावर त्यात जिरे घाला.

-नंतर हिंग आणि लाल मिरच्या घाला. नंतर हा मसाला डाळीत घाला आणि चमच्याने डाळी हलवा. आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा. तुमची ढाबा स्टाईल तडका दाल तयार आहे.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News