Haliwa Laddu Recipe: पावसाळ्यात खाण्यासाठी काहीतरी चविष्ट तसेच आरोग्यदायीसुद्धा हवे असते. त्यामुळेच आज आपण हळिवाच्या लाडूंची रेसिपी पाहणार आहोत. हे लाडू चवीला तर उत्तम असतातच, शिवाय ते आरोग्यासाठीसुद्धा अत्यंत फायदेशीर असतात. चला जाणून घेऊया सोपी रेसिपी…

हळीवचे लाडू बनवण्यासाठी साहित्य-
१ वाटी हळिवाच्या बिया
१ मोठे नारळ
२ १/२ वाटी गूळ
२ चमचे तूप
जायफळ पावडर
हळिवाचे लाडू बनवण्याची रेसिपी-
सर्वप्रथम, हळिवाच्या बिया नारळाच्या पाण्यात १ तास भिजवा.
नंतर नारळ किसून घ्या आणि ते तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.
आता एका पॅनमध्ये २ चमचे तूप टाका आणि सर्व साहित्य घाला आणि १/२ तास शिजवा.
यानंतर, मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर त्यात जायफळ पावडर घाला आणि मिश्रणाचे लाडू बनवा.
तुमचे हळिवाचे लाडू तयार आहेत. तुम्ही ते फ्रिजमध्ये १० दिवस आणि फ्रिजबाहेर ३ दिवस साठवू शकता.