पावसाळ्यात बनवा चटपटीत मसाले कणिस, १० मिनिटांत बनणारी रेसिपी

कणिसला थोडा मसाला लावून तुम्ही चटपटीत मसाला कणिस बनवू शकता.

Masala Kanis recipe:   पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत असते. अनेक लोक गरमागरम कणिस खायला पंसती देतात. कणिसला थोडा मसाला लावून तुम्ही चटपटीत मसाला कणिस बनवू शकता. हे खायला तर चविष्ट लागतेच शिवाय बनवायलाही अगदी सोपे असते. चला जाणून घेऊया मसाला कणीसची सोपी रेसिपी…

 

मसाला कणिस बनवण्यासाठी साहित्य-

३ कणिस
चवीनुसार काळे मीठ
चवीनुसार चाट मसाला
चवीनुसार लाल तिखट
चवीनुसार हिरवी चटणी (हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लिंबूपासून बनवलेली)
१ लिंबू

 

मसाला कणिस बनवण्याची रेसिपी-

 

एक मऊ कणिस घ्या आणि त्याची साल काढा.

जर कोळसा उपलब्ध नसेल, तर तुम्ही गॅसवर मध्यम आचेवर कणिस सहज भाजू शकता.

कणिस भाजल्यानंतर, लिंबावर लाल मिरची पावडर, काळे मीठ लावा आणि चाट मसाला लावा आणि कणिसवर चोळा. तुमचा मसाला कॉर्न तयार आहे.

चव बदलण्यासाठी, तुम्ही कणिसवर हिरवी मिरची आणि कोथिंबीरची मसालेदार चटणी देखील लावू शकता आणि ते खाऊ शकता.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News