Ashadhi Ekadashi Wishes: आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे. हा दिवस भगवान विष्णूच्या निद्रावस्थेचा काळ मानला जातो. जो चातुर्मासाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.

आषाढी एकादशी-
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला ही एकादशी येते. या दिवशी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांना हे खास शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता..
आषाढी एकादशी शुभेच्छा-
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवल पांडुरंग
जय जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्रभागेच्या तीरी,
उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी,
पाऊले चालतील वाट हरिची..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
तुला साद आली,
तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली
आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा