Kokan Railway – महाराष्ट्रात विविध सण साजरे केले जातात, त्यापैकी गणपती हा सण महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. या सणासाठी मुंबई, पुणे किंवा अन्य शहरातून चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. कोकणी माणूस गणपती आणि शिमग्याला गावी जातो. मात्र गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्यातून लोकं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडकडे जातात. गणपतीला गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे, मात्र बुकिंगवेळी कोकणवासियांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे.
एजंटचा सुळसुळाट…
दरम्यान, 23 जूनपासून ऑनलाईन तिकीट बुक करण्यात येत आहे. बुकीसाठी एका मिनिटातच बुकिंग फुल्ल दाखवले जात असून, 1,000 च्यावरती तिकीट वेटिंगवर असल्याचे दाखवत आहे. एजंटचा सुळसुळा असल्याचे प्रवाशांनी म्हटलं आहे. सध्या कोकण रेल्वेवरील बुकिंगसाठी लोकांची झुंबड उडली आहे. पण काही मिनिटातच बुकिंग फुल्ल दाखवले जात आहे. आणि 1000 च्यावरती वेटिंग लिस्ट दिसत आहे. पुन्हा बुक करायचं म्हटलं की, रिग्रेट असा मेसेज स्क्रीनवर दिसतो. त्यामुळे बुकिंग होत नसल्याच्या प्रवाशांची नाराजी व तक्रारी येताहेत.

प्रवाशांच्या तक्रारी व नाराजी…
दुसरीकडे आयआरसीटीने ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी प्रवाशांना सुविधा दिली आहे. मात्र याच्यावर एजंटचाच सुळसुळाट समोर आला आहे. एजंट तिकीट बुक करून ते तिकीट ब्लॅकने विकत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. दुसरीकडे ऑनलाईन बुकिंग हे काही वेळासाठीच खुले होते, त्यामुळे एकाच वेळी अनेकजण बुकिंग करत असल्यामुळे आयआरसीटीच्या वेबसाईटवर ताण येत आहे.
एकाच वेळी सगळे बुकिंग करत असल्यामुळे वेटिंग लिस्ट ही वाढत जाते, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली आहे. तसेच पुन्हा ऑनलाईन बुक करायचं म्हटलं की, रिग्रेट असा मेसेज स्क्रीनवर दिसतो. त्यामुळे बुकिंग होत नसल्याच्या प्रवाशांची नाराजी व तक्रारी येताहेत.